Urmi Patil Victory In Bharatnatya Competition In Singapore Kolhapur Marathi News
Urmi Patil Victory In Bharatnatya Competition In Singapore Kolhapur Marathi News  
पश्चिम महाराष्ट्र

लय भारी ! कोल्हापूरच्या उर्मीचा सिंगापूरमध्ये ठसा...!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरतनाट्यम्‌ स्पर्धेत जरगनगर येथील ऊर्मी पाटीलने चमकदार कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला. अथक परिश्रमाच्या जोरावर तिने हे यश संपादन करून कोल्हापूर शहराचेच नव्हे, तर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. 

जरगनगर-बळवंतनगर येथील पाटील कुटुंबातील ऊर्मी अवघ्या पाचव्या वर्षापासून नृत्य क्षेत्राकडे वळली. तिचे वडील राहुल पाटील हे महावितरणमध्ये अभियंता म्हणून काम करतात. आई वनिता पाटील व वडिलांनी ऊर्मीच्या कलेला वाव दिला. ती प्रसिद्ध नृत्यांगना संयोगिता पाटील यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवू लागली. तिने कोल्हापूरसह संगमेश्‍वर, गोवा, रत्नागिरी, पुणे, इचलकरंजीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्पर्धा गाजविल्या. तीन राष्ट्रीय स्पर्धेमधून बँकॉक, दुबईनंतर तिची सिंगापूर अशा तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणेतर्फे भरतनाट्यम्‌ स्पर्धा घेण्यात आली. यात देशभरातील सुमारे १२ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. यात वरिष्ठ गटात ऊर्मीने यश संपादन केले. तिच्या या यशामुळे तिची सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. यापूर्वी तिला ताराराणी युवा स्टेट पुरस्कार आणि बीआरएबी डायनॅमिक ॲवॉर्डने गौरविण्यात आले आहे.

दहावीत 96 टक्के गुण 

ऊर्मीने अथक प्रयत्न करून दहावीत ९६ टक्के गुणाबरोबर कलाक्षेत्रातही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल आम्ही पाटील कुटुंबीय भारावून गेलो आहोत. 
- वनिता पाटील, आई.

ऊर्मीचा दररोज पाच ते सहा तास सराव

न्यू कॉलेज विज्ञान शाखेत ११ वीमध्ये शिकणारी ऊर्मी निवडीनंतर दररोज पाच ते सहा तास सराव करू लागली. केवळ सराव नाही, तर शारीरिक तंदुरुस्तीसाठी तिला कष्ट घ्यावे लागले, पण गुरुसह आई-वडिलांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनावर ती स्पर्धेसाठी सज्ज झाली. नुकत्यात सिंगापूर येथे झालेल्या ९ व्या कल्चरल ऑलिंपियाड परफॉर्मिंग आटर्स, सिंगापूर स्पर्धेत तिने चौथा क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल तमाम कलाप्रेमींकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

India Aghadi : राहुल गांधींवर ‘इंडिया’चा दबाव

Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

Mahayuti Leaders : महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; आमदारांची नाराजी दूर करण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT