solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

उजनी लाभक्षेत्रात गव्हाचे पीक जोमात

राजाराम माने

केतूर (सोलापूर) - करमाळा तालुक्याच्या उजनी लाभ क्षेत्रात रब्बी हंगामातील गव्हाचे पीक जोमदार असल्याचे पाहावयास मिळत आहे. परिसरात थंडीचा कडाका जोरदार वाढल्याने गहू पिकास पोषक वातावरण मिळत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरिपाचा हंगाम वाया गेला त्यातच सर्वत्र पाणी टंचाई असल्याने शेतात कोणते पीक घ्यावे ? हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला होता. त्यातच उजनी उजनी पाणलोट पट्ट्यात उजनी जलाशयाचे पाणी झपाट्याने खाली होत असल्याने केलेल्या पिकाला ऐन उन्हाळ्यात अखेरच्या टप्प्यात पाणी मिळेल का नाही अशी शंका असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने हे पीक घेतले आहे.

परिसरात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने ऊस गाळपासाठी गेल्यानंतर मोकळ्या झालेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी लगेच गव्हाची पेरणी केली. सध्या गव्हाच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने व पाणीही वेळेवर मिळत असल्याने गव्हाचे पीक जोमदार आले आहे. असे असले तरी वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे गहू पिकाची उंची मात्र न वाढता बहुतांश ठिकाणचा गहु निसवु लागला असून त्यास ओंब्याही येऊ लागल्या आहेत. सध्या परिसरात ऊस तोडणी अतिशय मंद गतीने सुरू असल्याने या शेतकऱ्यांचे आगामी पिकाचे नियोजन मात्र ढासळले आहे.

खरिपातील ज्वारी पिकाने यावर्षी दगा दिल्याने गव्हाचे दर तेजीत आहेत (सध्या सरासरी दर ३५०० रुपये क्विंटल) ते यापुढेही तेजीतच राहतील असा अंदाज व्यक्त होत असल्याने गहु उत्पादक खुषीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT