पश्चिम महाराष्ट्र

इचलकरंजीत तरूणाचा निर्घृण खून

पंडित कोंडेकर

इचलकरंजी - येथील वखार भागात एका युवकाचा चाकूने सपासप सुमारे 14 वार निर्घुन खून केला. आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सनी संजय आवळे (वय 17, रा.नेहरूनगर ) असे मृताचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली होती. 

मृतदेह आयजीएम रुग्णालयात आणल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मृताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सनी हा वखार भाग परिसरात एका खासगी कंपनीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कामाला जात होता. वडील खासगी वाहनांवर चालकाचे काम करतात. सनी हा नेहमीप्रमाणे आज रात्री घरी जेवून कामावर जाण्यासाठी निघाला होता. 

वखार भागात आल्यानंतर त्याच्यावर संशयितांनी हल्ला केला. धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले. यामध्ये छाती, पोट, कंबर, हात आदी शरीरावर विविध ठिकाणी  12 ते 14 वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गुन्ह्यात वापरलेला चाकू छातीत तसाच राहिला होता. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी आले. पोलीस व नागरिकांनी सनीला तातडीने आयजीएम रुग्णालयात हलविले. मात्र तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. 

नेहरुनगर व आवळे गल्ली परिसरातील नागरिकांनी आयजीएम रुग्णालयात मोठी गर्दी केली. यामध्ये तरुणांची संख्या मोठी होती. नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनेनंतर अनेक अफवांना पिक आले. त्यामुळे पोलिसांनी पळापळ झाली. रुग्णालयात अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांनी भेट देवून घटनेबाबत माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT