Aditya Thackeray
Aditya Thackeray 
पश्चिम महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या विनापरवाना सभेप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (नगर) : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची रस्त्यावर विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी युवा सेना प्रमुख निखिल अनिल पवार व मंडप मालक रंजीत सुर्यभान शेळके (रा. प्रभाग सात, श्रीरामपूर) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठाकरे यांनी सुरु केलेली जन आशिर्वाद यात्रा काल (ता. २२) शहरात आली होती. त्यानिमित्त येथील आझाद मैदानासमोरील मुख्य रस्त्यावर ठाकरे यांची जाहिर सभा झाली. सभेसाठी एका बाजुने मंडप व खुर्च्या टाकून रस्ता पुर्णपणे अडविण्यात आला होता. यापुर्वी नवरात्र उत्सवात पोलिसांनी देवी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडप उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावेळी आंदोलन झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सवावर बहिष्कार घातला होता.

काल सभेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर सोशल मिडीयातून टिकेचा भडिमार झाला. त्यानंतर पोलिसांनी परवानगी नसताना रस्त्यात मंडप घालून सभा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. पोलिस शिपाई राजु मेहेर यांनी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT