पिंपरी-चिंचवड

माजी उपमहापौरांचा वाढदिवस संपला तरी शुभेच्छापर फलक 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरीतील मोरवाडी, सम्राट चौकात भाजपच्या एका माजी उपमहापौर यांचे छायाचित्र असलेले सहा अनधिकृत फलक दहा दिवसांपासून लावलेले आहेत. चार दिवसापूर्वी वाढदिवस होवूनही फलक झळकत आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 

या उपमहापौराचा नऊ जानेवारीला वाढदिवस झाला. यानिमित्त स्थानिक कार्यकर्त्यांकडून चौक- चौकात मोठ मोठे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. काही फलक महावितरणच्या खांबालादेखील लावलेले आहे. दुतर्फा फलक लावल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. मोरवाडी, लालटोपीनगर, टिपू सुल्ताननगर, इंदिरा नगर या परिसरात फलक आहेत. लोकप्रतिनिधींकडूनच शहर विद्रूप होत असल्याने नाराजी आहे. 

कारवाईत दुजाभाव 
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला परिसरात अनधिकृत फ्लेक्‍स कोठे लावले आहेत, याबद्दल माहिती असूनही कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे, या मार्गावरील पदपथावर बसून, हातगाडी लावणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर अतिक्रमणाबद्दल कारवाई होते, अशी तक्रार व्यावसायिक करू लागले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT