
यूकेतील कोविड स्ट्रेनमुळे (UK Covid Strain) निलंबित करण्यात आलेल्या विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु करण्याचे निर्देश भारत सरकारने दिले आहेत.
नवी दिल्ली- यूकेतील कोविड स्ट्रेनमुळे (UK Covid Strain) निलंबित करण्यात आलेल्या विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु करण्याचे निर्देश भारत सरकारने दिले आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टॅडर्ड ऑपरेंटिग प्रोसीजर (Union Health Ministry) जारी केली आहे. 8 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्टॅडर्ड ऑपरेंटिग प्रोसीजर लागू असेल. कोणताही प्रवासी तिसऱ्या देशातून यूकेत आणि त्यानंतर भारतात येणार नाही, याची मॉनिटरिंग डीसीजीए करणार आहे. याचा अर्थ यूकेतून भारतात येणारे कोणतेही प्रवासी तिसऱ्या देशातून भारतात येणार नाहीत.
सीरमनंतर स्वदेशी भारत बायोटेकच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता; बैठक सुरु
SoP नुसार सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मागील 14 दिवसांच्या ट्रव्हल हिस्ट्रीची माहिती द्यावी लागेल आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणावं लागणार आहे. सर्व प्रवाशांना www.newdelhiairport.in वर प्रवास करण्याच्या 72 तासाआधी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणे अनिवार्य असणार आहे. याशिवाय भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना निगेटिव्ह आरटी सीपीआर टेस्ट रिपोर्ट दाखवणे अनिवार्य आहे. हा रिपोर्ट ऑनलाईन पोर्टलवरही अपलोड करावा लागणार आहे.
सर्व एअरलाईन्सला प्रवासी निगेटिव्ह आरटी सीपीआर टेस्ट रिपोर्ट आणत असल्याची खात्री करुन घ्यावी लागेल. तसेच विमानतळावर RT-PCR टेस्ट करण्यात येईल. या टेस्टचा खर्च प्रवाशांनाच करावा लागणार आहे.
मुलींना यंदा मिळणार नाही उपस्थिती भत्ता ! शाळा बंदमुळे राज्यात 250 बालविवाह
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विमानतळावर हेल्प डेस्क फॅसिलीटी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टेस्टमध्ये संक्रमित आढळल्यानंतर प्रवाशांना आयसोलेट केले जाणार आहे. जर प्रवाशामध्ये यूकेचा नवा स्ट्रेन आढळून आला, तर त्याला वेगळ्या आयसोलेशन यूनिटमध्ये ठेवण्यात येईल. तसेच त्याच्यावर प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील. अशा प्रवाशांची 14 दिवसांनी पुन्हा एकदा RT-PCR टेस्ट केली जाईल. प्रवाशी पुन्हा पॉझिटिव्ह आल्यास जोपर्यंत त्याची दोन वेळा RT-PCR टेस्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्याला डिस्चार्ज देण्यात येणार नाही.
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये येणाऱ्या विमानांना निलंबित करण्यात आलं होतं. पण, पुन्हा एकदा केंद्र सरकारने विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.