Janak Kamgunda
Janak Kamgunda sakal
पिंपरी-चिंचवड

Hinjewadi News : आयटीत स्वातंत्र्यदिनी वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी - स्वातंत्र्यदिनी आयटी परिसरात दोन घटनांमध्ये दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. रिहे, भेगडेवाडी (मुळशी) बंधाऱ्यात पोहायला गेलेला हिंजवडीतील केपीआयटी कंपनीत संगणक अभियंता असलेला हर्षित पोटलूरी (वय २७) याचा बुडून मृत्यू झाला.

तर हिंजवडी येथे विजवाहक तारांचा शॉक लागून हंगामी वायरमन असलेला जनक कामगुंडा (वय २२) याचा मृत्यू झाला. शोधमोहीम राबवल्यानंतर बुडालेल्या हर्षितचा मृतदेह सापडला. हर्षित पोटलूरी मुळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी असून सध्या हिंजवडीत राहत होता.

हिंजवडीमध्ये विजवाहक तारांच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

आयटी नगरी माण-हिंजवडीमध्ये हंगामी वायरमन मदतनीस म्हणून काम करणारा जनक कामगुंडा (वय-२२, रा. सध्या माण, मूळ : लातूर) हा पांडवनगर, हिंजवडी येथे विद्युतवाहक तारांपाशी बिघाड दुरुस्तीचे काम करत होता. त्याला विजेचा जोरदार धक्का लागून तो खाली पडला. दवाखान्यात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

जनक हा त्याचा दाजी तानाजी हनुमंत काकनाळे यांच्याकडे राहत होता. काकनाळे हे महावितरणमध्ये वायरमन म्हणून काम करतात. विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वीच काकनाळे यांचा बोडकेवाडी फाट्यावर काम करताना विजेचा धक्का लागून अपघात झाला होता. त्यात ते खांबावरून खाली पडल्याने त्यांना मोठी दुखापत होऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मेव्हण्याच्या बाबतीत ही घटना झाल्याने माण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतरांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या वायरमनच्या आयुष्यात काळोख

महावितरण विभागात असलेला अंतर्गत समन्वयाचा अभाव, सुरक्षिततेची अपुरी साधन सामुग्री व असंख्य त्रुटींमुळे वीजवाहक तारांचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू होण्याच्या किंवा तो गंभीर जखमी होऊन अधू होण्याच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे. आयटी पार्क हिंजवडीच्या पट्ट्यात आशा घटना वारंवार घडत आहेत.

मात्र, सध्या महावितरणमध्ये तात्पुरत्या स्वरूपात किंवा काम कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. अशी एखादी दुर्घटना अथवा अपघात झाल्यास महावितरण प्रशासन चक्क जबाबदारी झटकून मोकळे होते. अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे इतरांचे जीवन प्रकाशमान करणारे वायरमनच गडद काळोख पचवत काम करीत असल्याचे वास्तव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon at Kerala: मॉन्सून प्रगतीपथावर, चोवीस तासात केरळमध्ये लावणार हजेरी; महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : उद्यापासून मध्य रेल्वेचा ६२ तासांचा मेगाब्लॉक; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द होणार

Ankush Gupta Research : मोबाईल लॅपटॉप अन् इलेक्ट्रिक कार.. १ मिनिटात चार्ज होणार ; भारतीय संशोधकाने बनवले 'हे' तंत्रज्ञान

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

SCROLL FOR NEXT