Child Begger
Child Begger sakal
पिंपरी-चिंचवड

चौका-चौकात भीक मागणाऱ्या बालकांकडे लक्ष देण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

भीक मागणे हा गुन्हाच..! त्यात लहान बालकांकरवी भीक मागणे, त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त करणे हा देखील गुन्हाच आहे.

- बेलाजी पात्रे

वाकड - भीक मागणे हा गुन्हाच..! त्यात लहान बालकांकरवी भीक मागणे, त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त करणे हा देखील गुन्हाच आहे. मात्र, शहरातील प्रमुख चौका-चौकात राजरोस भीक मागणाऱ्या बालकांचे जथ्थे उदयास आली आहेत. अलीकडे पिंपरी-चिंचवड शहरात लहान बालकांचे अपहरण, खून अशा घटना घडल्या आहेत. त्याच अनुषंगाने शहरात मुले पळवणारी टोळी आल्याची जोरदार अफवा अन भीती देखील नागरिकांत आहे. त्यामुळे हि भिक्षेकरी मुले कोण? ती आली कोठून याकडेही पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच या मुलांना मायेचा आसरा देण्यासाठी सामाजिक संस्था, संघटनानी पुढे येण्याची गरज आहे. पण पोलीस लक्ष देत नाहीत अन सामाजिक संघटना दुर्लक्ष करतात, त्यामुळे ही मुले मायेची भिकारी झाली आहेत.

बावधनचा डुग्गु व निगडीच्या ओमचे अपहरण अन सुदैवाने सुटका, चिंचवड येथील आदित्यचे अपहरण करून गळा घोटला गेला, एचए मैदानात चिमुरडीवर बलात्कार करून खून झाला, वाकड मधील मुलगी व चिखलीतील मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्नाची अफवा. अशा काही घटनामुळे शहरात विविध अफवा पसरल्या असून, पळवून नेलेल्या मुलांना कालांतराने भीक मागण्यास भाग पाडले जाते. असे मोठे रॅकेट असल्याची चर्चा व समज नागरिकांत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाच्या चौकात भीक मागणाऱ्या लहान बालकांना भीक मागण्यापासून प्रवृत्त करत त्यांची चौकशी करून पुनर्वसन करने गरजेचे आहे.

डांगे चौक, वाकड चौक, हिंजवडी लक्ष्मी चौक, आकुर्डी खंडोबा माळ, पिंपरी मोरवाडी चौक, काळेवाडी फाटा, मानकर चौक, जगताप डेअरी, चिंचवड स्टेशन, भोसरी पीएमटी चौक व अन्य काही चौकात लहान बालकांना घेऊन धोकादायक पद्धतीने भीक मागण्याचे प्रकार चालू आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, पोलिस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना पिंपरी विधानसभा विभागप्रमुख आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता दीपक कांबळे यांनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

अनेक चौकात चारही सिग्नलवर प्रत्येकी एक महिला, दोन लहान मुले लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करतात. सिग्नल लागताच दुचाकी व इतर वाहनातील लोकांपुढे हात पसरतात. काकुळतीने भावनिक साद घालतात. त्यामुळे संवेदनशील व्यक्तीचा हात आपसूकच खिशाकडे जातो. काही वेळा महिला व मुले थेट हाताला किंवा पायांना धरून विनवणी करतात त्यामुळेही काहींचे मन द्रवते, तर अनेक जण त्यांचा स्पर्श टाळण्यासाठी नाईलाजाने पैसे काढतात.

प्रतिक्रिया

शहरातील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान बालकांना घेऊन सिग्नलवर धोकादायक पद्धतीने भीक मागितली जात आहे. पोलिसांनी पाहणी करुन चौकशी करावी. मुंबई भिक्षेकरी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्या मुलांची भिक्षेकऱ्यांकडून सुटका करावी. निराधार, विनापालक आढळणाच्या मुला-मुलींना संरक्षण देऊन त्यांना राहत्या गावी, नजीकच्या बालगृहात पाठवून पुनर्वसन करावे

- दिपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ता

भिक्षेकरी व विकृत तृतीयपंथी यांच्यावर आम्ही वेळोवेळी कारवाई करतो ही एक सततची प्रक्रिया आहे. मात्र, हे भिक्षेकरी आणि तृतीयपंथी कारवाई झाल्यास लपून छपून व दुसरा चौक गाठून भीक मागतात. ज्या-ज्या चौकात लहान बालकांकरवी भीक मागण्याचे प्रकार सुरू आहेत त्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल गरजेनुसार अशा बालकांचे काही सामाजिक संस्थाच्या मदतीतून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न असेल.

- अंकुश शिंदे, (पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT