पिंपरी-चिंचवड

Video : कोरोनात लग्नाचा इव्हेंट करायचाय, तर हे आहेत 'मायक्रो वेडिंग' पॅकेज

आशा साळवी

पिंपरी : ऐन लग्न समारंभाच्या हंगामात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'ला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सरकारने आता विवाह सोहळ्याला परवानगी दिल्याने कोरोनात लग्नाचा इव्हेंट कसा करायचा, याचे पॅकेज बाजारात आले आहे. एरवी इव्हेंटवाल्यांकडून एका लग्न समारंभासाठी दीड ते दोन लाख खर्च यायचा. मात्र, आता तो खर्च चक्क दीड लाखांवरून 20 हजारावर आला आहे. यासाठी वेडिंग प्लॅनर्स यांनी 50 लोकांसाठी 'मायक्रो वेडिंग' पॅकेज बनवले आहेत. 

लॉकडाउनमुळे तब्बल तीन महिन्यांपासून 'वेडिंग इव्हेंट इंडस्ट्रीज' सगळा सिझन कमाईविना गेला. साक्षीगंध ते वरातीपर्यंतचा एक दिवसाचा खर्च मागील काही वर्षात लाखोंच्या घरात जाऊन पोहोचला आहे. एकेका छोट्या- मोठ्या इव्हेंट कंपनीला महिन्याला 10 ते 12 ऑर्डर मिळायच्या. त्यात वास्तूशांती, लग्नाचा वाढदिवस, बारसे, बर्थडे पार्टी असे कार्यक्रम असत. एकावेळी 400 ते 500 लोकांचे केटरिंग आणि डेकोरेशनचे पॅकेज मिळायचे. एका इव्हेंटमधून साधारणपणे दीड ते दोन लाखांची कमाई व्हायची. मात्र, यावर्षी अर्थकारणच फसल्याने लाखोंची कमाई करून देणाऱ्या व्यावसायिकांची साखळी उद्‌ध्वस्त झाली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आता सरकारने केवळ 50 वऱ्हाडी मंडळीला लग्नात बोलविण्याची परवानगी दिल्याने जेथे 400 लोकांचे पॅकेज मिळायचे. तेथे 50 लोकांवर कार्यक्रम घेण्याची वेळ आली आहे. या महामारीतही तग धरण्यासाठी लग्नांचा इव्हेंट करण्यासाठी 20 ते 40 हजार रुपयांचे 'मायक्रो वेडिंग पॅकेज' आता बाजारात आले आहेत. लॉनवर लग्न, वरातीसाठी नाश्‍ता, जेवण, स्वीट डिशचा समावेश आहे. यात पाहुण्यांना डिजिटल पत्रिका पाठवत आहेत. लग्नाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅनर मीटर व इतर उपकरण लावत आहे.

आता लग्नासाठी दक्षिण भारतीयांप्रमाणे एक छोटासा चांगला मंडप तयार केला जातो. लग्नासाठी मेन्यू देखील कमी केला असून, प्लेटमधून 'शो ऑफ' पदार्थ हटविले आहेत. जेवण वाढताना महागड्या प्लॅस्टिक प्लेटऐवजी केवळ डिस्पोजल वापरले जात आहे. वेडिंग ड्रेससोबत लोक मॅचिंग मास्क देखील घेत आहेत. पाहुण्यांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, टिशू दिले जात आहेत. उपस्थित व्यक्तींची मर्यादा तसेच प्रत्येकाच्या लग्न खर्चाच्या बजेटनुसार आयोजकांकडून पॅकेज दिले आहे. या पॅकेजमध्ये मंडपऐवजी तंबूमध्ये विवाहसोहळा करण्याची कल्पना इव्हेंटवाल्यांनी पुढे आणली आहे. संपूर्ण तंबूचे निर्जंतुकीकरण करून सामाजिक अंतर ठेवत बैठकीची व्यवस्था, मास्क, मेकपसाठी व्यक्ती, ब्राह्मण, जेवण, लग्नाचे हार, अक्षता, फोटोग्राफर शूटिंग यासह आवश्‍यक गोष्टी या पॅकेजमधून पुरवण्यात येत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"कोरोनामुळे वेडिंग इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. कारण अनेकांचे घर या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही 20 ते 40 हजारापर्यंत पॅकेज घेऊन आलो आहोत.त्यामुळे ग्राहकांनी लोकल बिझनेस पाठिंबा दिला पाहिजे.'' 

- गौरव चव्हाण, वेडिंग प्लॅनर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT