water.jpg
water.jpg 
पिंपरी-चिंचवड

'सकाळ'मध्ये बातमी आली अन् लगेच 'त्या' भागातील...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : थेरगाव-पडवळनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने एकेका कुटुंबातील चार-पाच जण आजारी पडल्याची तक्रार नागरीकांनी केली होती. याबाबत "सकाळ'मध्ये "जलजन्य आजाराची साथ' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्‌ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने तात्काळ त्या परिसरातील नागरिकांच्या घरातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली.

महापालिकेकडून होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे थेरगाव - पडवळनगरमधील नागरिक आजारी पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. एकेका कुटुंबातील चार - पाच जण आजारी पडत असल्याने नागरिक हैराण झाले होते. स्थानिक दवाखान्यात जाऊन तपासणी केल्यावर डॉक्‍टरांनीदेखील पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार व साथीचे रोग होत असल्याचा निर्वाळा दिला होता.

नागरिकांनी पुरवठा विभाग व आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. मात्र महापालिका पाणी पुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक वैतागले होते. स्थानिक नागरिकांनी "सकाळ'कडे तक्रार केली होती. नागरिकांनी पिण्याचे पाणी कपड्याने गाळून घेतले तरी ते दूषितच दिसत असल्याची तक्रार प्रमोद शिंदे व देवेंद्र नामदास यांनी केली. पडवळनगरच्या आळीतील प्रत्येक घरातील एक -दोन जण पोटदुखी, अतिसाराने आजारी पडल्याने महापालिकेकडे वारंवार तक्रार केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर पाणी पुरवठा विभागाचे रमाकांत सुर्वेसह चार कर्मचाऱ्यांनी पडवळनगरमध्ये जाऊन पिण्याची पाण्याची तपासणी केली. प्रमोद शिंदे यांच्यासह आजूबाजूच्या पाच घरांतील पिण्याच्या पाण्याची नमुने तपासले. मात्र, पाणी दूषित नसल्याचा निर्वाळा कर्मचाऱ्यांनी दिला. पण नेमका त्रास कशामुळे होतोय अशा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT