Rohit Pawar and ajit pawar
Rohit Pawar and ajit pawar Esakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : काका-पुतण्याच्या नेतृत्वाची पुनरावृत्ती

पीतांबर लोहार

पिंपरी - उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांचा बालेकिल्ला, अशी शहराची ओळख. काका-पुतणे मिळून सुमारे ३० वर्षे शहराचे नेतृत्व केले. आता परिस्थिती बदलली आहे. पक्षात फूट पडली आहे. पुतण्याने (अजित पवार) भारतीय जनता पक्षाला साथ दिली. शहरात ते सक्रिय झालेत.

मात्र, काकांना (शरद पवार) पक्षासाठी नवीन पदाधिकारी शोधण्याची वेळ आली. त्यांना नवीन नेतृत्वाचीही गरज होती. ती त्यांचे नातू (पुतणे राजेंद्र पवार यांचे चिरंजीव) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भरून काढली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून दोन वेळा शहरात येऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

अजित पवार यांनीही दोन वेळा शहरात येऊन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यामुळे शहराच्या नेतृत्वात पुन्हा एकदा काका-पुतणे (अजित पवार आणि रोहित पवार) सरसावले आहेत. फरक इतकाच की तेव्हाचे काका-पुतणे (शरद पवार व अजित पवार) एकत्र होते. आताचे काका-पुतणे (अजित पवार व रोहित पवार) बदलत्या राजकीय परिस्थितीत वैचारिक दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात आहेत. कोण प्रभावशाली ठरतं, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश पवार यांचे ‘होमपिच’ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात होता. त्याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तेव्हापासून पवार काका-पुतण्यांचा बालेकिल्ला अशीच शहराची ओळख राहिली. महापालिकेतही त्यांचाच दबदबा होता. तो २०१७ च्या महापालिका निवडणुकीपासून हळूहळू कमी कमी झालेला दिसतो.

त्यात गेल्या दोन महिन्यांपासून बदल होताना दिसत आहे. अजित पवार भाजपसोबतच्या सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शहरात पुन्हा सक्रिय झाले आहेत. तर, त्यांच्या भाजपसोबत जाण्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (शरद पवार गट) निर्माण झालेली पोकळी त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

असाही इतिहास

शरद पवार व अजित पवार काँग्रेसमध्ये असताना आणि १९९९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महापालिकेवर त्यांचे वर्चस्व होते. ‘अजित पवार यांचा शब्द म्हणजे शरद पवार यांचा शब्द आहे,’ असे मानून कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यरत होते. मात्र, २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली.

शहराचे विभाजन मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात झाले. ‘बारामती’शी शहराचा संबंध तुटला. तत्कालीन भाजप-शिवसेना युतीने २००९ व २०१४ च्या निवडणुकीत दोन्ही लोकसभा मतदारसंघ (मावळ व शिरूर) ताब्यात घेतली.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची एकहाती सत्ता आली. पवार यांच्या सुमारे २५ वर्षांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सलग १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. २०१९ च्या लोकसभेची त्यात भर पडली. मावळमधून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पराभूत झाले. पवार यांचे काही प्रमाणात शहराकडे दुर्लक्ष झाले.

अजित पवार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत गेले. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि तिसऱ्याच दिवशी स्वगृही परतले. शिवसेनेने भाजपची साथ सोडत कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन केले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. अडीच वर्षानंतर सरकार कोसळले.

शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. पाठोपाठ अजित पवार भाजपसोबत गेले. शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी शहरातील राष्ट्रवादीची विभागणी झाली. बहुतांश आजी-माजी पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले.

शरद पवार गटाला नवीन कार्यकर्ते शोधावी लागले. विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागली. अजित पवार सक्रिय झाले आहेत. साहेबांचा गट पिछाडीवर दिसत होता. हीच बाब हेरून अजित पवार यांचे चुलत पुतणे आमदार रोहित पवार यांनी शरद पवार गटाची धुरा आपल्याकडे घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT