Accident
Accident sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Accident : दोन्ही बसमध्ये सापडून मॅकेनीक विभागातील सहाय्यक कारागीर महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

शिवशाही बसच्या समोर ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल्या मॅकेनीक विभागातील सहाय्यक महिला कारागीर दोन्ही बसमध्ये सापडून मोठा अपघात झाला.

पिंपरी - वल्लभनगर एसटी आगारातील पार्किंगमध्ये एसटी बस काढताना एअर ब्रेक न लागल्याने एसटी समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी शिवशाही बसच्या समोर ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल्या मॅकेनीक विभागातील सहाय्यक कारागीर शिल्पा कैलास गेडाम (वय 38) या दोन्ही बसमध्ये सापडून मोठा अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

वल्लभनगर आगाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, परतूर (जालना) आगाराची बस पार्किंगधून काढण्यासाठी चालक प्रयत्न करत होता. मात्र, अहमदपूर आगाराची (लातूर) बस मधातच उभी असल्याने परतूर आगाराच्या बसचा वाहक प्रशांत रमेश वाडकर हा अहमदपूर आगाराची बस बाजूला काढण्यासाठी त्या बस चालकाच्या सीटवर बसला. त्याने ती बस सुरू केली मात्र, बसमध्ये हवा कमी असल्याने ब्रेक लागलाच नाही. आणि समोर असलेल्या शिवशाही बसवर ती बस आदळली.

यामध्ये शिवशाही बसमधील ऑईलची तपासणी करणार्‍या शिल्पा या दोन्ही गाडीच्या मध्ये चेंबुन गंभिर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वल्लभनगर आगार प्रशासनाच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT