Sarpanch of Shirgaon murder crime pimpri police  sakal
पिंपरी-चिंचवड

Shirgaon Sarpanch Murder : शिरगावच्या सरपंचाचा धारदार हत्याराने वार करून खून

काही महिन्यांपूर्वीच झाली होती सरपंचपदी बिनविरोध निवड

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मावळ तालुक्यातील शिरगावचे विद्यमान सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७, रा. खळवाडी, शिरगाव) यांचा तिघांनी धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना शिरगाव येथे शनिवारी (ता. १) रात्री घडली.

गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध सरपंच म्हणून त्यांची निवड झाली होती. शनिवारी रात्री शिरगाव येथील साई मंदिरासमोर ते मित्रांसह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करीत हल्ला चढवला केले.

यामध्ये गोपाळे गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोपाळे यांना तातडीने रुग्णालतात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले..हा खून कोणत्या कारणावरून झाला. हल्लेखोर कोण आहेत, हे अद्याप समजू शकले नाही. गोपाळे हे जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. शिरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhad Mahotsav : इच्छुक उमेदवारांकडून यावर्षी प्रथमच गाव पातळीपासुन तालुकापातळीपर्यंत आखाड महोत्सवाचे आयोजन

Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह कसा हाताळावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Shanukripa Heartcare: हृदयविकारावर शस्त्रक्रियेविना उपचार! शनिकृपा हार्टकेअर सेंटरचा २५ वर्षांचा यशस्वी प्रवास

Junnar News : अंबोलीतील दाऱ्याघाटात पर्यटकांची झुंबड; निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी सहलींच्या संख्येत होतेय वाढ

SCROLL FOR NEXT