old age people  sakal
पिंपरी-चिंचवड

जगण्यातील संघर्षाने दाखवली वृद्धाश्रमाची वाट

दीड वर्षांपासून काम बंदमुळे नाईलाजाने घ्यावा लागला पोटच्या मुलांचा निर्णय

सुवर्णा गवारे-नवले

पिंपरी : दोघेही पती-पत्नी शिक्षित. खासगी कंपनीत कामाला होते. लॉकडाउनमध्ये दोघांचीही नोकरी गेल्याने दीड वर्षांपासून हाताला काम नाही. मुलाला वडीलांच्या आजारपणाचा खर्च पेलवेना. कुटुंब चालवणे अवघड झाले. अशा द्विधा मन:स्थितीत जन्मदात्याची आबाळ होवू नये, यासाठी पोटच्या मुलाने वडीलांना (वय ७३) वृद्धाश्रमात ठेवले. नातवंडांची रोज सवय असलेल्या या आजोबांना मात्र काहीसे अस्वस्थ होत आहे.

हडपसर गाडीतळ परिसरात राहणारे मध्यमवर्गीय कुटुंब. मूळचे कर्नाटकचे. जोडप्याला दीड वर्षाचे लहान मूल. लॉकडाउननंतर वणवण नोकरीसाठी फिरले. दहा ते बारा हजारावर काही दिवसांपूर्वी त्यांना काम मिळाले आहे. परंतु, वडिलांचा सांभाळ करून हाती मिळालेले काम देखील त्यांना स्वीकारता येईना. बरेच दिवस सुनेने सासऱ्याची सेवा केली. परंतु, आता घरखर्चही भागत नसल्याने आजोबांचा सांभाळ करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वडीलांना कोणी विनाशुल्क सांभाळत आहे का? याची त्यांनी चौकशी केली, आणि शेवटी त्यांना चिंचवड बिजलीनगर भागातील गजानन महाराज मंदिराशेजारी शाखा असलेल्या मातृभावी सेवाभावी संस्थेमध्ये त्यांची सोय झाली. आठ दिवसांपूर्वी त्यांनी वडीलांना वृद्धाश्रमात दाखल केले. संस्थेने माणुसकी नात्याने वडीलांच्या आजारपणाचा व जेवणाचा खर्च उचलला आहे. अंथरुणाला खिळवून असल्याने त्यांना जागेवरच जेवण भरवावे लागत आहे.

कोरोनामुळे चित्र बदले

चिंचवडमधील ही घटना प्रातिनिधिक स्वरूपात आहे. परंतु, कोरोना काळात हतबल व असहाय्य झालेल्या प्रत्येकाला या परिस्थितीतून जावे लागत आहे. कोरोना काळात घराघरांतील चित्र बदलले आहे. वृद्धाश्रमाची वाट धरणाऱ्या या जोडप्याच्यापुढे वाईट संकट उभे ठाकले आणि रोजचा जगण्याच्या संघर्षामुळे त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागला. अनेक प्रश्न ज्येष्ठांच्यापुढे उभे ठाकले आहेत. खिशात पैसा असणाऱ्यांनी देखील वृद्धाश्रमातील जगणे स्वीकारले आहे. बऱ्याच वृद्धांनी कोरोना काळात घर सोडून वृद्धाश्रमाची वाट धरल्याचे वास्तव वृद्धाश्रमचालकांनी सांगितले.

"मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थिती पाहिली. दोघांनाही नोकरी नसल्याने घरभाडे भरणे, त्यांना अवघड झाले होते. अशावेळी मी त्या आजोबांना घेऊन आलो. त्यांचा खुबा निकामी आहे. सेवेसाठी माणसे स्वतंत्र लागत आहेत. कोरोना काळात खरंच खूप बिकट परिस्थिती अनुभवली. ही वेळ कोणावर येवू नये. नोकरी लागल्यानंतर व घरखर्च पेलवल्यास ते त्यांना घेऊन जाणार आहेत. परंतु, त्यांना सांभाळणे कठीण आहे. त्यासाठी येणारा खर्च त्यांना झेपणारा नाही. मी सध्या विनामूल्य सेवा देत आहे."

- सुहास गोडसे, मातृसेवा सेवाभावी संस्था संस्थापक, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT