esakal | पिंपरी : पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांचे निगडीत आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation for Water

पिंपरी : पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांचे निगडीत आंदोलन

sakal_logo
By
अक्षय साबळे

पिंपरी - निगडी यमुनानगर, सेक्टर २२, ओटास्कीम परिसरात गेल्या तीन दिवसांपासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा (Watersupply) सुरू आहे. काही भागात पाणीच आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची (Citizens) गैरसोय होत आहे. तक्रार करूनही अधिकारी दखल घेत नसल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा नेला. पाणीपुरवठा विभागाचा निषेध करून अभियंता शहाजी गायकवाड यांच्या आसनावर व नामफलकाला काळे फासले. पांढरा रंग फेकला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे नगरसेवक सचिन चिखले यांनी यांच्या नेतृत्वाखाली यमुनानगर, सेक्टर २२, ओटास्कीम परिसरातील काही नागरिक फ क्षेत्रीय कार्यालयात पोहचले. पाणीपुरवठा अनियमित होत आहे, काही भागात तीन दिवसांपासून पाणी आलेले नाही याचा जाब पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी जाधव यांना विचारला. काहींनी त्यांना गराडा घातला. पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचाही इशारा दिला.

हेही वाचा: कोकणात जायचंय! दुसरा डोस हवाय

नगरसेवक चिखले म्हणाले, ‘‘अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाण्याच्या पंप नादुरुस्त झाला होता. वीज पुरवठा खंडित झाला होता. परंतु, पाण्याची अडचण पंधरा दिवसांपासून आहे. व्हॉल्वमन सुद्धा त्यांच्या सोयीनुसार कधीही पाणी सोडतात. वेळोवेळी तक्रारी करूनही त्या सोडवल्या नाहीत. अधिकारी उडवाडवीची उत्तरे देतात. या भागातील जलवाहिन्या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या दुरुस्त करणे आवश्‍यक आहे. यात सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासू.’’

महापालिका फ क्षेत्रीय कार्यालय पाणीपुरवठा विभाग अभियंता शहाजी गायकवाड म्हणाले, ‘‘यमुनानगर, सेक्टर २२ परिसरामध्ये तीन पंपांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातील एका पंपची विद्युत केबल खंडित झाली होती. विद्युत विभागातर्फे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. पण, अन्य दोन पंपाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. नादुरुस्त झालेला पंप दोन तासांत दुरुस्त झाला. त्यानंतर त्याद्वारेही पाणीपुरवठा सुरू झाला.’’

loading image
go to top