पिंपरी-चिंचवड

चिंचवड, वाल्हेकरवाडीतील विसर्जन घाट, हौदांची स्वच्छता

CD

चिंचवड, ता. ७ ः आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध विसर्जन घाट व हौदांची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपआयुक्त सचिन पवार, ‘ब’क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहायक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांच्या देखरेखीखाली आदित्य बिर्ला घाट, मोरया घाट, केळकर घाट, जाधव घाट आणि काळेवाडी घाट येथील स्वच्छतेच्या कामांना गती देण्यात आली आहे. त्यामध्ये चिंचवड येथील बिर्ला घाट आणि वाल्हेकरवाडी येथील जाधव घाटाची सुमारे ८० टक्के स्वच्छता पूर्ण झाली आहे. उर्वरित घाटांवरील कामे रविवारपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य निरीक्षक मुकेश जगताप, वैभव गौडार आणि संतोषी कदम यांनी मनुष्यबळाच्या साहाय्याने योग्य नियोजन करून ही कामे मार्गी लावली आहेत.
महापालिकेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन शांततापूर्वक व स्वच्छतेत पार पडावे यासाठी तयारीला वेग देण्यात आला आहे. नागरिकांनीही स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

CWD25A01742

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson ने राजस्थानची साथ सोडल्यास कॅप्टन कोण?

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT