किवळे, ता.२८ : गेल्या महिन्याभरापासून निगडी - किवळे बीआरटीवरील तसेच म्हस्के वस्ती ते रावेत रस्त्यावरील झाडांना पाणी मिळत नसल्याने झाडे सुकली आहेत. त्याबद्दल निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
निगडी, प्राधिकरण, किवळे, रावेतला जोडणाऱ्या रावेत येथील धर्मराज पुलावर महापालिका ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयातील उद्यान विभागाने तर म्हस्के वस्ती ते रावेत रस्त्यावर ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील उद्यान विभागाने वृक्षारोपण केले आहे.
परंतु, त्यांच्याकडून वेळेवर पाणी दिले जात नसल्याने पाण्याअभावी अनेक रोपे सुकली आहेत. रोपांच्या बुंध्याजवळ उन्हामुळे भेगा पडल्या आहेत, अशीच परिस्थिती ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील उद्यान विभागाच्या हद्दीत म्हस्के वस्ती ते रावेत रस्त्यावर दिसून येत आहे. खासगी टँकर मार्फत झाडांना पाणी देण्यासाठी महापालिका पैसा खर्च करत असते. सध्या मात्र ही झाडे पाण्या अभावी मरण यातना सहन करत असल्याकडे सुरेश भोंडवे, अमरसिंग हिरे, पूनम लोहार, सविता कोंडे, राणी जगताप यांनी लक्ष वेधले आहे.
KIW25B04340
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.