पिंपरी-चिंचवड

जुना मामुर्डी- सांगवडे लोखंडी पूल बंद

CD

किवळे, ता.२३ : पिंपरी चिंचवड महापालिका व पीएमआरडीएमार्फत भागीदारी तत्वावर करण्यात येत असलेल्या सांगवडे - मामुर्डीस जोडणाऱ्या पवना नदीवरील स्मशानभूमीजवळील नवीन पुलाचे काम सध्या सुरू आहे. परंतु पर्यायी व्यवस्था न करता जुना लोखंडी पूल पूर्णतः धोकादायक घोषित करुन तो वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेने एका परिपत्रकाद्वारे वरील आदेश दिला आहे. या आदेशात स्पष्टपणे नमूद आहे की, या पुलाची सध्याची स्थिती अतिशय धोकादायक असून जुन्या पुलावरून वाहतूक पुन्हा सुरू करणे शक्य नाही. वाहतूक बंदचा निर्णय सुरक्षेच्यादृष्टीनेच घेतला आहे. पर्यायी रस्त्याची व्यवस्था होईपर्यंत पुलावरची वाहतूक पूर्णतः बंद राहील. नवीन पूल व जोड रस्त्यांचे काम सुरू आहे.
मात्र, या निर्णयामुळे सांगावडे, मामुर्डी परिसरातील नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी जांबे - शिरगाव मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून या भागासाठी पर्यायी मार्ग देण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पर्यायी व्यवस्थेचेही आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे असेही स्पष्ट केले आहे की, जुना पूल बंद ठेवणे आवश्यक आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने लोकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ निर्णय घेऊन पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

पुलावरील वाहतूक बंद केल्याने सर्वाधिक त्रास विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत असल्याने वेळ व श्रम दोन्ही वाया जात असून अनेक विद्यार्थी रडकुंडीला आले आहेत. आम्हाला तर पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे अशा दोन दुचाकी ठेवाव्या लागत आहेत.
- स्वाती पटवर्धन, रहिवासी, टेराग्रीन सोसायटी, सांगवडे

पीएमआरडीए आणि महापालिका यांच्याकडून नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात नदीवर काम सुरू व्हायला अजून चार महिने लागतील. तो पर्यंत नागरिकांसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
- बाबासाहेब औटी, ग्रामस्थ, सांगवडे

सध्या मामुर्डी हद्दीत नव्या पुलाचे काम सुरू आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणीच नवीन पुलाचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे जुना पूल पाडावाच लागणार आहे.
- अमोल पवार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: मोबाईल, हेडफोनवर बोलणाऱ्या बस चालकांची आता खैर नाही, 'पीएमपीएमएल'ने घेतला मोठा निर्णय

आनंदाची बातमी! 'दसरा-दिवाळीसाठी सोलापूर विभागातून २३० जादा गाड्या'; मध्य रेल्वेचा निर्णय, मराठवाड्यासह सोलापूरकरांची पुण्याला जाण्याची सोय

Pune News : ‘किरकी’ नव्हे, आता आपली ‘खडकी’च; मराठी अधिकाऱ्याच्या प्रयत्नांना यश, २०० वर्षांनंतर नावात बदल

Latest Marathi News Updates: सरकारचा १२ लाखांचा महसूल बुडाला, महसूल मंत्री बावनकुळेंनी महिला अधिकाऱ्याचं केलं निलंबन

Asia Cup Hockey 2025 : भारतीय महिलांकडूनही गोलवर्षाव; सिंगापूरचा १२-० ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT