पिंपरी-चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये रंगली बालजत्रा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान

CD

पिंपळे सौदागर, ता. १५ : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त जिजामाता उद्यानात लहान मुलांसाठी बाल जत्रा भरविण्यात आली. आरोग्य शिबिर व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक शंकर जगताप, शत्रुघ्न काटे, मावळ तालुकाध्यक्ष रवी भेगडे, निर्मला कुटे, शेखर महाराज जांभूळकर, ऋषीकेश चोरघे, आनंदा काटे, उमेश शेलार, जगन्नाथ काटे, विजय पांडुरंग जगताप, वसंत काटे, संदीप काटे, शारदा मुंडे, अजित पाटील, अतुल पाटील, गणेश भुजबळ, राजेंद्र जयस्वाल आदी उपस्थित होते.
यावेळी सलग २० वर्ष नावाडी म्हणून काम करणारे धोंडिबा काटे, दशक्रिया विधी कार्य करणारे पांडुरंग वाळुंजकर, सुमारे ५०० विवाह सोहळ्यांमध्ये सूत्रसंचालन करणारे सुनील कुंजीर, लेखक- वक्ता- उद्योजक नामदेवराव जाधव आणि महादेव मंदिरात पन्नास वर्षे सफाई काम करणारे बाबूराव भालेकर या पाच व्यक्तींचा उन्नतीच्यावतीने सन्मान करण्यात आला.

आमदार जगताप, महेश लांडगे, उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी संयोजन केले.

फोटो ओळ : पिंपळे सौदागर : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार अश्विनी जगताप, शत्रुघ्न काटे, कुंदा भिसे, संजय भिसे व इतर.
फोटोः 15733

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT