पिंपरी-चिंचवड

तासिका तत्त्वावरील अध्यापक राबताहेत मानधनाविना

CD

पिंपरी, ता. ७ ः शासकीय व अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या आम्हा अध्यापकांचे मानधन दोन वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे आर्थिक कोंडी झाली असून, प्रलंबित मानधन केव्हा मिळेल याकडे डोळे लागले आहेत. आमच्यापैकी अनेकांनी प्रतीक्षेला कंटाळून रामराम केला आहे, असे अनेक अध्यापक सांगतात.

उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखाली या महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती केली आहे. पूर्वी त्यांना तीन किंवा चार महिन्यांनी मानधन मिळत होते. आता २०२२ पासून वर्षभर मानधन न मिळालेले नाही. लाखो रुपयांचे मानधन शासनाकडे थकीत आहे. मानधनावरच कुटुंब किंवा पुढील शिक्षण सुरू राहील, अशी स्थिती अनेकांची आहे.

अध्यापकांचे मानधनाचे दर निश्चित
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखाली पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सैद्धांतिक, प्रात्यक्षिक आदी कामांसाठी संदर्भाधीन शासन निर्णयांन्वये तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधनाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या मानधनात शासन निर्णयान्वये आता वाढ केलेली आहे.

अभ्यासाचा प्रकार सैद्धांतिक प्रति तास दर / प्रात्यक्षिक दर
- कला, वाणिज्य, विज्ञान (पदवी) ः ६२५/२५०
-.कला, वाणिज्य, विज्ञान (पदव्युत्तर) ः७५०/३००
- शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण
(पदवी / पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) ७५०/३००
- विधी (पदवी/ पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) ७५०/३००
--

कोट
‘‘मी चार वर्षापासून मानधनावर काम करत आहे. गेले वर्षभर मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मानधन मिळालेले नाही. सुमारे एक लाखाहून अधिक रक्कम आम्हाला अद्याप मिळाली नाही.
- भारती काळे, अध्यापक

कोट
मानधन गेल्या 2 वर्षापासून अदा करण्यात आले नाही. तरी तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे प्रलंबित मानधन तत्काळ अदा करण्याची मागणी आम्ही करत आहोत.’’
-अमर एकाड, अध्यक्ष कॉप्स विद्यार्थी संघटना

कोट
अशासकीय अनुदानित महाविद्यालये, अकृषिक विद्यापीठे, अभिमत विद्यापीठांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे २०२२-२३मधील थकीत वेतन अनुदान प्रस्ताव सादर करण्याच्या महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. थकीत वेतनाची छाननी केल्यावर वितरण करण्यात येईल.
--शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी शिक्षण संचालक, उच्च शिक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT