पिंपरी-चिंचवड

पोटनिवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी

CD

पिंपरी, ता.११ ः निवडणूक विषयक पुढील प्रक्रिया आणि उमेदवारांनी करावयाच्या आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी आज (ता.११) बैठक पार पडली. थेरगाव निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षक एस.सत्यनारायण, निवडणूक पोलिस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी उमेदवाराने ठेवायच्या दैनंदिन खर्चाच्या पद्धती, स्ट्रॉंग रूमची तयारी, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन, आदी विविध विषयांची माहिती दिली. बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शीतल वाकडे, शिरीष पोरेडी, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर, निवडणूक कक्ष अधिकारी प्रशांत शिंपी, आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे उपस्थित होते.
--
उमेदवारांसाठी माहिती
- ईव्हीएम यंत्र स्थलांतरित करताना तेथे उपस्थित राहता येईल
- ईव्हीएम यंत्र व्यवस्थापनाची सर्व प्रक्रिया पूर्व सूचना देवूनच केली जाईल
- मतदान यंत्राची सरमिसळ करताना उपस्थित राहता येईल.
- उमेदवारांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विविध कक्ष स्थापन
- तेथे सुविधा उपलब्ध
- उमेदवाराने स्वतंत्र प्रतिनिधी नेमून दैनंदिन अहवाल निवडणूक खर्च कक्षाकडे सादर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT