पिंपरी-चिंचवड

आकुर्डी परिसरात वीजेचा लपंडाव

CD

पिंपरी, ता. २६ ः वाढत्या उकाड्यामुळे शहरातील नागरिक दिवसेंदिवस हैराण होत आहेत. त्यामध्ये
आकुर्डी परिसरामधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेक नगर- तुळजाईवस्ती, एकतानगर, क्रांतीनगर टेल्को, कपूर कॉलनी, आकुर्डी गावठाण, पंचतारानगर, गुरुदेवनगर, गणेशनगर, गंगानगर, शुभश्री सोसायटी परिसर सुभाष पांढरकरनगर, ज्ञानेश्‍वर कॉलनी आणि भंगारवाडी या सर्व परिसरामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे या सर्व परिसरामधील नागरिक त्रस्त झाले आहेत.

या परिसरामध्ये घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील नागरिकांचे टीव्ही फ्रिज यांसारखे अनेक उपकरणे खराब होत आहेत, याला जबाबदार कोण? वीज पुरवठ्याचा सुरू असलेला लपंडाव लवकरात लवकर थांबवावा, आणि विद्युत विभागाने नागरिकांना वीज पुरवठा नियमित पुरवावा. अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

त्याचप्रमाणे परिसरात रस्त्याचे काम सुरू असेल, तर त्या ठिकाणी खोदकाम करत असताना एखादी भूमिगत केबल टाकताना तुटली तर त्यांची वीज पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्वरित दखल घेतली जात नाही. केबल दुरुस्त करण्यासाठी सहा ते आठ तास वीज पुरवठा खंडित होतो. यावरही महावितरण विभागाने लक्ष द्यावे. अशी मागणी येथील निखिल दळवी यांनी केली. आकुर्डी परिसरातील महावितरणाच्या तक्रारी संदर्भात आपल्या विभागाकडून लवकरात लवकर निवारण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

चिंचवडमध्ये वारंवार वीज गुल
लिंक रोड चिंचवड ला आज दिवसभर वीज गेली आहे. महावितरण कंपनीचे लोक फोन उचलत नाहीत. कॉल सेंटर चा फोनही लागत नाही लोकांनी कामे कशी करायची? वारंवार चिंचवड परिसरात वीज पुरवठा खंडीत होत आहे. कधी सुरू होईल सांगता येत नाही

‘‘उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढलेली आहे. त्‍यामुळे अतिरिक्त भारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. फिडर बंद पडत आहेत. ’’
-पल्लवी देशपांडे, सहायक अभियंता, आकुर्डी विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT