पिंपरी-चिंचवड

महापालिका निवडणूक दिवाळीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांचे स्पष्ट संकेत; पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक

CD

पिंपरी, ता. १३ ः ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका होतील. त्यानंतर म्हणजे महापालिका निवडणूक नोव्हेंबर किंवा डिसेंबर अखेरीस लागण्याची शक्यता आहे,’’ असे सांगून दिवाळीनंतरच महापालिका निवडणूक होईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. १३) दिले. या दृष्टीने पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियोजन करण्याचा आदेशही त्यांनी दिला.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक अजित पवार यांनी पुण्यात घेतली. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी आमदारांनी व पक्षाच्या माजी नगरसेवकांनी एकत्र येऊन पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग आणि बूथ स्थरावर पक्ष बांधणीला सुरवात करावी, असा आदेशही पवार यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कामाला सुरवात करावी. बूथ स्तरावर पक्ष बांधणीकडे लक्ष द्यावे.’’

एकदिलाने काम करा
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आपल्याला पाच महिन्यांचा अवधी मिळणार आहे. या कालावधीत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्या. सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांच्याशी संवाद साधा. संघटना बांधणी करा. खास करून प्रभाग व बूथ स्तरावर पक्षाची घडी बसवावी. निवडणूक वेळेवर लागेल, त्यामुळे कोणतीही गडबड न करता नियोजनपूर्वक आणि एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पक्षात जुने-नवे कार्यकर्ते एकत्र आले, तर निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Khatal: गटार साफसफाईच्या दुर्घटनेतील दोन्ही कुटुंबांना मदत मिळवून देऊ: अमोल खताळ; कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन

Shubhanshu Shukla Return : आज अंतराळातून पृथ्वीवर परतणार शुभांशू शुक्ला; सोबत घेऊन येत आहेत 'हा' खजिना..

Weekly Horoscope 14 to 20 July 2025: जुलैचा तिसरा आठवडा, कोणत्या राशींना मिळणार यश अन् समृद्धी? वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाहीय : सुप्रिया सुळे

Crop Insurance Scheme: अशी आहे नवीन पीकविमा योजना; सहभागी होण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

SCROLL FOR NEXT