
संगमनेर : भूमिगत गटार साफसफाईच्या दुर्घटनेत मयत झालेल्या ठेकेदार आस्थापनेवरील अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शनिवारी (ता. १२) देण्यात आले, तर दुसऱ्या मृत तरुण रियाज ऊर्फ जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही शासन दरबारी भरीव स्वरूपाची मदत मिळवून देण्याचा ठाम विश्वास आमदारांनी व्यक्त केला.