Crop Insurance Scheme: अशी आहे नवीन पीकविमा योजना; सहभागी होण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत
Maharashtra Agriculture: राज्य सरकारने एक रुपयांत मिळणारी पीकविमा योजना रद्द करून नवीन हप्ता भरावयाची योजना सुरू केली आहे. बोगस शेतकरी रोखण्यासाठी ॲग्रिस्टॅक आयडी आणि ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकराने एक रुपयात पीकविमा योजना बंद करत नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पीकविमा हप्ता रक्कम भरावी लागणार असून, त्यामुळे बोगस शेतकऱ्यांची संख्या रोखता येईल, अशी अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.