पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

रस्त्याची योग्य डागडुजी करा
भोसरीतील सरी-दिघी रस्ता संविधान चौक परिसरात काही दिवसांपूर्वी खोदकाम करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने काँक्रिट टाकून करण्यात आली आहे. हा चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावरील या अयोग्य दुरुस्तीमुळे वाहनांना वेगाने न जाता धीम्या गतीने जावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने येथे योग्य पद्धतीने डागडुजी करून डांबरीकरण करावे.

- वीरेंद्र शिंदे, भोसरी-दिघी

00882

दापोडीतील खेळाचे मैदान अस्वच्छ
दापोडी परिसरातील गणेशनगर येथील गणेश मंदिराच्या पाठीमागे, गणेश किनारा सोसायटीजवळ लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे. मात्र सध्या या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. तसेच झाडांच्या फांद्या व पालापाचोळा मोठ्या प्रमाणात साचलेला असल्याने ते धोकादायक ठरत आहे. याशिवाय मैदानात कचराही साचलेला असून त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने मैदानाची साफसफाई करून गवत कापण्याची व्यवस्था करावी.

- रंगनाथ डगळे, दापोडी
00883


धर्मराज चौकातील डिजिटल स्क्रीन खराब
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सुविधांसाठी स्वच्छ सर्वेक्षण, जनजागृती, सुरक्षा व साक्षरता यासंदर्भातील माहिती देण्यासाठी रावेत येथील धर्मराज चौकात डिजिटल (स्मार्ट) डिस्प्ले स्क्रीन बसविला आहे. मात्र सध्या हा डिस्प्ले स्क्रीन खराब अवस्थेत आहे. स्क्रीनमधील एलईडी लाईट सतत चालू-बंद होत असल्यामुळे वाहनचालक तसेच परिसरातील दुकानदारांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन महापालिकेच्या जाहिरात विभागाने तातडीने हा डिस्प्ले बोर्ड दुरुस्त करावा.
-विलास खरे, रावेत
00884


सांडपाणी वाहिनी तुंबल्याने नागरिक त्रस्त
चिंचवडगाव येथील बिजलीनगर परिसरातील पवनानगर रोडवरील ए.बी.सी. हौसिंग सोसायटी क्र. ४ मधील सी बिल्डींगच्या प्रवेशद्वारासमोर मलनिस्सारण वाहिनी तुंबली आहे. रस्त्यावरील मुख्य सांडपाणीवाहिनी भरल्यामुळे सांडपाणी बाहेर येऊन रस्त्यावर साचत आहे. सी बिल्डिंगसमोरील मोकळ्या जागेत तसेच सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि कंपाउंडलगत सांडपाणी वाहत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन मलनिस्सारण वाहिनीची साफसफाई करण्याची व्यवस्था करावी.
इंद्रजित चव्हाण, बिजलीनगर
00881

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT