रावेत, ता.९ ः रावेत आणि आकुर्डी परिसरातील बाजारपेठा सध्या दिवाळीच्या खरेदीत रंगल्या आणि सजल्या आहेत. दुकाने, स्टॉल्स आणि रस्त्यांवर विद्युत माळा, दिवे, कंदील, फटाके, मिठाई आणि सजावटीच्या वस्तूंची रेलचेल पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाइन खरेदी वाढली असली तरी यंदा नागरिक स्थानिक बाजारात प्रत्यक्ष खरेदीचाही आनंद घेत आहेत.
रावेत, आकुर्डी परिसरातील नागरिकांनी घरांची रंगरंगोटी, फटाक्यांची खरेदी तसेच नव्या कपड्यांच्या खरेदीला सुरुवात केली आहे. मुलांमध्ये फटाक्यांबाबत उत्साह आहे; तर महिलांमध्ये पारंपरिक साड्या, दागदागिने आणि गृहसजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी उत्सुकता आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा उत्साह आणि आनंद स्पष्टपणे झळकत आहे.
रावेतमधील डी-मार्ट चौक, म्हस्के वस्ती रस्ता तसेच आकुर्डीतील तेली आळी चौक, स्टेशन रोड परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत आहे. पारंपरिक वस्तूंसोबत आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. हस्तनिर्मित कंदील, मातीचे दिवे, सुगंधी अगरबत्त्या, रांगोळीचे रंगीत रंग, एलईडी लाइट्स आणि एखाद्या संकल्पनेवर आधारित सजावट यामुळे बाजारपेठा रंगतदार झाल्या आहेत. त्याने नागरिकांचा उत्साह वाढला असून बाजारपेठा सणाच्या आनंदाने उजळून निघाल्या आहेत. व्यापाऱ्यांनी दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने सजवली असून निरनिराळ्या दिवाळी ऑफरचे फलक दुकानांबाहेर दिसू लागले आहेत. अनेक ठिकाणी महिलांच्या स्वयंसहायता गटांनी पारंपरिक मिठाई, फराळाचे पदार्थ तसेच हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स लावले आहेत. यंदा ग्राहकांची खरेदी क्षमता वाढली असून गेल्या वर्षीपेक्षा २० ते २५ टक्के अधिक उलाढाल अपेक्षित आहे. विशेषतः मिठाई, दिवे, आणि गृहसजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे, असे शिवशाही व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.