तळेगाव दाभाडे, ता. २० : नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अखेर प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २०२२ च्या रचनेनुसार ती कायम ठेवण्यात आली असून, काहीसा बदल झाला आहे. एकूण मतदार संख्या ५६ हजार ४३५ इतकी असून या प्रभाग रचनेनुसार या निवडणुकीत १४ प्रभागांतून २८ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
तळेगाव दाभाडे हे मावळ तालुक्यातील वेगाने वाढणारे शहर आहे. येथील लोकसंख्या व विकासकामांचा वेग पाहता नगर परिषद निवडणूक नेहमीच चर्चेत असते. प्रभाग रचनेमुळे निवडणुकीची समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, सर्वच राजकीय पक्षांनी आधीच काही प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, या प्रभाग रचनेबाबत ३१ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.
प्रभाग क्रमांक आणि परिसर
एक : कल्पना सोसायटी, बायोडायव्हर्सिटी पार्क, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल, यशवंतनगर, सरस्वती शाळा
दोन : इंद्रायणी गार्डन, नम्रता आयकोनिक, बालाजी मंदिर, मायमर क्लिनिकल लॅब, नाना भालेराव कॉलनी, राधाकृष्ण मंदिर, स्वामी कुंज अपार्टमेट, सारस्वत बॅंक, साईपूजा अपार्टमेंट
तीन : व्हीटीपी भाग्यस्थान, आरएमके नेचर्स क्लासिक, स्नेहदत्त हॉस्पिटल, बनसोडे हॉस्पिटल, इंद्रायणी कॉलेज, डॉ. खान ईएनटी रिसर्च सेंटर, सत्यकमल कॉलनी, योजनानगर
चार : सिद्धीविनायक गणेश मंदिर, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडिअम स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, आनंदनगर, मनोहरनगर
पाच : श्री जिरावाला पार्श्वनाथ जैन मंदिर, तळेगाव दाभाडे नगर परिषद, आदर्श विद्या मंदिर, शांताई सिटी सेंटर, लिटल हर्टस सोसायटी, अमरहिंद मित्रमंडळ
सहा : राजगुरव कॉलनी, बेलाडोर सोसायटी, फन स्क्वेअर मल्टिप्लेक्स, शिक्षक सोसायटी
सात : तळेगाव रेल्वे स्टेशन, सेवाधाम हॉस्पिटल, गवत बाजार, हरणेश्वर हॉस्पिटल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान, हॉटेल मयुरेश, मावळ लॅन्ड, अल्टिनो कॉलनी
आठ : पूर्वा गार्डन, लेक पॅराडाइज, लँटिस सोसायटी, नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज, लेक कॅसल, तळेगाव दाभाडे तळे, मंत्रा सिटी, १०० केव्ही तळेगाव एमएसईडीसीएल, फ्लोरा सिटी, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल
नऊ : कलापिनी रंगमंदिर, रावेरा बेकरी, काडोलकर कॉलनी भाग, लायन्स क्लब, इमेज प्लाझा, वर्धमान रेसिडेन्सी, नवमी हॉटेल, नाना-नानी पार्क
दहा : एंजेल हिल्स, खंडोबा मंदिर, हॉटेल मनजित, भगिनी निवेदिता सहकारी बॅंक
अकरा : श्री शिवाजी चित्रपटगृह, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, बाजारपेठ मस्जिद, पंकज मेटल शॉप
बारा : बनेश्वर मंदिर, डोळसनाथ मंदिर, ज्ञानेश्वरनगर, सिल्वर व्हॅली, सिक्स विशेष, बामनडोह, घोरावाडी रेल्वे स्टेशन
तेरा : नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी, आकार फाउंड्री, संस्कृती तलाव
चौदा : मोहर प्रतिमा, जैन इंग्लिश मीडियम स्कूल, गजानन महाराज मंदिर, राव कॉलनी, पोलिस स्टेशन, थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे प्राथमिक शाळा, नगर परिषद स्पोर्टस कॉम्प्लेक्स, योगीराज हॉल, प्रथम रेसिडेन्सी, संस्कृती सोसायटी.
मागील निवडणूक निकालाचा आढावा
येथील नगर परिषदेची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. त्यावेळी भाजपचे १४, तळेगाव दाभाडे शहर विकास, सुधारणा समितीचे सहा, तर स्व. किशोर आवारे यांच्या जनसेवा विकास समितीचे सहा नगरसेवक निवडणूक आले होते.
चुरस वाढणार
राज्यात महायुतीचे सरकार असले, तरी विधानसभेच्या निवडणुकीपासून तळेगाव दाभाडे येथील राजकीय गणिते बदलली आहेत. या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र येतात, की स्थानिक पातळीवर विरोधी भूमिका घेऊन स्वतंत्र लढतात यावर भविष्यातील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.
TDB25B03628
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.