पिंपरी-चिंचवड

उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू

CD

तळेगाव स्टेशन, ता.२६ : ‘‘औद्योगिक सुरक्षेचा भंग करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल; तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलिस प्रशासन ठामपणे उद्योजकांच्या पाठीशी उभे आहे. खंडणी, माथाडी आदींच्या संदर्भात काही त्रास झाल्यास उद्योजकांनी निर्भयपणे पुढे येऊन स्थानिक पोलिस ठाणे, औद्योगिक तक्रार निवारण कक्ष अथवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. आम्ही खंबीरपणे आपल्यासोबत उभे आहेत,’’ असा विश्वास पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला.
तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी इंडिया कंपनीच्या सभागृहात गुरुवारी (ता.२६) चौबे यांनी उद्योजकांशी खुला संवाद साधत औद्योगिक सुरक्षा, वाहतूक कोंडीसह त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, औद्योगिक तक्रार निवारण कक्ष प्रमुख सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे, एमआयडीसीचे सहायक अभियंता किरण कंक, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जयप्रकाश सगरे, सहाय्यक अभियंता प्रशांत पवार, जेसीबी इंडियाचे प्रकल्प प्रमुख संकेत वीरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
चौबे म्हणाले, ‘‘वाहतूक कोंडी आणि रहदारीवरील ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करावेत. अंतर्गत सुरक्षेसोबतच कंपन्यांनी सभोवतालचा सार्वजनिक परिसर आणि रस्त्यांवर देखील सीसीटीव्ही कॅमेरे केंद्रित करावेत. कामगार हिताच्या आणि सुरक्षेच्यादृष्टीने कंपन्यांनी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करुन दुचाकीस्वार कर्मचारी, कामगारांना हेल्मेट सक्ती करावी.’’
तळेगाव औद्योगिक संघटनेचे जगदीश यादव यांनी प्रातिनिधिक स्वरुपात तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांचा पाढा वाचून दाखवला. त्याची दखल घेत चौबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ उपाय योजना करण्याबाबत सूचना केल्या. वाहतूक नियंत्रण नियमितपणे कराव्यात, वाहतूक कोंडीसाठी पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत; तोपर्यंत तात्पुरत्या उपाय योजनांवर भर दिला जावा, अशा सूचना चौबे यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. पोलिस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी आभार प्रदर्शन करताना तळेगाव, चाकण, हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी निवारण करण्यासाठी वाहतूक विभागाकडून सुरू असलेल्या उपाय योजनांसह ‘ट्रॅफिक बडी’ पीसीएमसी व्हॉट्स ॲप बॉटची विस्तृत माहिती दिली.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत जाधव, तळेगाव वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश लोंढे, तळेगाव औद्योगिक संघटनेचे जगदीश यादव आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

कोणत्या समस्या मांडल्या...
- नवलाख उंबरे येथील अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी
- एमआयडीसीत फोफावलेले अनधिकृत भंगारवाले
- भर रस्त्यावरील अवजड कंटेनरची पार्किंग
- ओबडधोबड गतिरोधक, वारंवार बंद पथदिवे
- रखडलेले ट्रक टर्मिनलचे काम, आंबीतील धोकादायक आर्यलंड

इतर समस्या
- एमआयडीसीतील साचणारा कचरा
- खराब झालेले रस्ते, अतिक्रमणे
- टप्पा क्रमांक-२ मधील वीजपुरवठ्याची अनियमितता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT