
Key Features of Tesla’s Luxury Car: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आपलं भारतातील पहिलं शोरूम मुंबईत बीकेसी येथे उघडलं आहे. याशिवाय त्यांची सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारही मॉडेल-वाय लाँच केली आहे.याच पार्श्वभूमीवर आपण टेस्लाच्या या अत्याधुनिक आणि अलिशान कारबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.
टेस्लाच्या मॉडेल-वाय या कारची सुरुवातीची किंमत ५९.८९ लाख एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. मॉडेल वाय भारतात दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल, पहिला RWD आणि दुसरा लॉन्ग रेंज RWD असेल. त्याच्या टॉप व्हेरिएंटची म्हणजेच लॉन्ग रेंजची किंमत ६७.८९ लाख एक्स-शोरूम आहे.
मात्र खरी बातमी ही आहे की ही कार सध्या अवघ्या २२,२२० रुपयांना तुम्हाला बुक करता येणार आहे. परंतु ही रक्कम नॉन रिफंडेबल असणार आहे. शिवाय तुम्ही बुकिंग केल्यानंतर सात दिवसांच्या आत तुम्हाला ३ लाख रुपये देखील जमा करावे लागणार आहेत, त्यानंतरच बुकिंग कन्फर्म मानले जाईल.
सध्या कंपनीकडून या कारसोबत पूर्णपणे ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग फीचर दिले गेलेले नाहीत, मात्र जर कुणाला हे फिचर हवे असतील तर त्यास सहा लाख रुपये भरून ते मिळवता येतील. याशिवाय, कंपनीकडून असंही कळवण्यात आलं आहे, की कारच्या अन्य इंटरनेट फिचरबाबत वेळोवेळी अपडेट दिले जातील, जे चालकाने लक्ष देवून अपडेट करून घेणे आवश्यक आहे.
टेस्ला भारतात कार बनवत नसल्याने, सरकार सध्या त्यावर आयात शुल्क लावणार आहे. भारतात आलेल्या मॉडेल वाय कार टेस्लाच्या शांघाय प्लांटमधून मागवण्यात आल्या आहेत. भारतातील नियमांनुसार, जर 40,000 डॉलरपेक्षा कमी किमतीची पूर्णपणे तयार गाडी (CBU) आयात केली तर त्यावर सुमारे 70 टक्के कर भरावा लागतो. अशा प्रकारे, प्रत्येक टेस्ला कारवर 21 लाख रुपयांपेक्षा जास्त आयात शुल्क लावण्यात आले आहे. टेस्लाच्या कार भारतापेक्षा अमेरिका आणि चीनमध्ये स्वस्त आहेत. कारण म्हणजे टेस्ला चीन आणि अमेरिकेत कार बनवते. त्यामुळे त्यावर वेगवेगळे कर लागत आहेत.
सध्या टेस्ला कार दिल्ली, गुरुग्राम आणि मुंबई साठी बुक करता येते. प्रत्येक राज्य त्यांच्या ईव्ही धोरणानुसार इलेक्ट्रिक कारवर वेगवेगळे कर लावते आणि खरेदीदारांना सबसिडी देते. अशा प्रकारे कारची किंमत देखील वेगळी असू शकते. तरी, ही कार दिल्ली आणि हरियाणामध्ये अधिक महाग असेल, कारण ही कार प्रथम मुंबईत येईल आणि तेथून ती दिल्लीला आणली जाईल.
टेस्ला मॉडेल Y भारतात एकूण 7 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यात पुढच्या बाजूला १५.४ इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि मागच्या प्रवाशांसाठी ८ इंचाचा डिस्प्ले आहे. यात ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, १९ इंचाचा क्रॉसफ्लो व्हील्स, फिक्स्ड ग्लास रूफ, साउंड-रिड्यूसिंग अकॉस्टिक ग्लास पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि स्टीअरिंग कॉलम आणि पॉवर रिअर लिफ्टगेट अशी लक्झरी वैशिष्ट्ये असतील.
ही कार फक्त 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते. याशिवाय, जर तुम्ही सुपरचार्जरवरून फक्त 15 मिनिटे चार्ज केले तर ही कार तुम्हाला सुमारे 238 किमी ते 267 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. तर भारतात, टेस्ला मॉडेल Y च्या RWD (रीअर-व्हील-ड्राइव्ह) प्रकारात दोन बॅटरी पर्याय असतील. एक 60 kWh आणि दुसरा 75 kWh चा मोठा बॅटरी पॅक आहे. या प्रकारात एकच इलेक्ट्रिक मोटर आहे जी सुमारे 295 hp ची शक्ती देते. 60 kWh बॅटरी असलेली कार एका चार्जवर सुमारे 500 किमी (WLTP रेंज) धावू शकते, तर लाँग रेंज मॉडेलमध्ये ही रेंज सुमारे 622 किमी पर्यंत जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.