बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपं म्हणजे कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. आज हे जोडपं आई-बाबा झाले आहेत. मंगळवारी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून या जोडप्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. कियारा आणि तिची नवजात कन्या दोघेही सुखरूप आहेत.