हिंजवडी, ता. ११ : प्रवेश बंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन करुन हिंजवडी आयटी पार्कमध्ये प्रवेश करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या अवजड वाहनांविरोधात वाकड आणि हिंजवडी वाहतूक पोलिस शनिवारी (ता.११) अखेर ‘ॲक्शन मोड’वर आले. आयटी पार्कमध्ये शिरकाव करण्याच्या प्रयत्नातील ३० अवजड वाहनांवर गुन्हे दाखल केले. तर ७७ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर सात ठिकाणी प्रवेश बंदी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने, भूमकर चौक परिसरात अवजड वाहनांना रोखण्यात आले. त्यामुळे, रस्त्याच्या एका बाजूला अवजड वाहनांच्या लांब रांगा लागल्या. आयटीतील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी नुकतीच नवीन वाहतूक नियमावली लागू करण्यात आली आहे.
आयटी पार्क पंचक्रोशीतील प्रमुख रस्त्यांवर सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. याबाबत वाहन चालक-मालकांना सूचना देऊनही काही वाहन चालकांकडून सर्रासपणे नियम धाब्यावर बसविले जात होते. त्यातूनच गेल्या वर्षभरात अनेक गंभीर अपघात झाले. अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले. याबाबत सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्याने हिंजवडी आणि वाकड वाहतूक विभागाकडून जड वाहनांविरोधात धडक कारवाई करण्यात आली.
PNE25V59296
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.