Bhau Kadam esakal
Premier

Bhau Kadam: चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांना लेकीनं दिलं खास गिफ्ट; पाहा व्हिडीओ

Bhau Kadam: नुकताच भाऊ कदम यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदमनं (Mrunmayee Kadam) शेअर केला आहे.

priyanka kulkarni

Bhau Kadam: छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते भाऊ कदम (Bhau Kadam) हे त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. भाऊ कदम यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या कॉमेडी स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळते. आता नुकताच भाऊ कदम यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदमनं (Mrunmayee Kadam) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृण्मयी ही भाऊ कदम यांना एक खास भेटवस्तू देताना दिसत आहे.

मृण्मयीनं शेअर केला व्हिडीओ

भाऊ कदम यांची लेक मृण्मयी ही युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. मृण्मयी सोशल मीडियावर नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मृण्मयी ही तिचे वडील भाऊ कदम यांना एक खास गिफ्ट देताना दिसत आहे. मृण्मयीनं भाऊ कदम यांना एक शूज गिफ्ट म्हणून दिला. या गिफ्टचा व्हिडीओ शेअर करुन मृण्मयीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज मी तुमच्यामुळे येथे आहे आणि मी खरोखरच कृतज्ञ आहे. मला आशा आहे की, तुम्हाला माझा अभिमान आहे आणि मला माहित आहे की तुम्ही कायाम माझ्या आहात."

पुढे मृण्मयीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मला नेहमी माझ्या पहिल्या पगारातून तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं, तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी मी थोडी बचत केली आता, तुम्हाला आयुष्यात जे हवं ते विकत घ्यायला तुमची मुलगी आली आहे!!! मी तुम्हाला गिफ्ट्स देणे कधीच थांबवणार नाही. जरी तुम्ही मला भेटवस्तू विकत घेतल्याबद्दल फटकारलं. तरी मी तुम्हाला गिफ्ट देईल. पण मी तुमच्यावर प्रेम करते." मृण्मयीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मृण्मयी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. मृण्मयीच्या युट्यूब चॅनलला 74.7K फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : वारजे माळवाडीत नवीन बसथांब्याजवळ कचऱ्याचे ढीग, कचरा कुजून परिसरात दुर्गंधी; प्रवाशांसह स्थानिक रहिवासी त्रस्त

Hybrid SUVs : पेट्रोल अन् इलेक्ट्रिक दोन्हीही! महिंद्रा आणि मारुती आणत आहेत स्वस्तात मस्त ब्रँड कार, जबरदस्त फीचर्स जाणून घ्या

"मराठीतील कांतारा...!" दशावताराची गोष्ट सांगणाऱ्या मराठी सिनेमाचा ट्रेलर VIRAL; प्रेक्षक अवाक

Pune Kothrud Police case: तीन तरुणींसोबत धक्कादायक कृत्य,चौकीत रात्रभर आंदोलन तरी तक्रार नाही

Ambad News : महागाईमुळे गॅस सिलेंडर परवडत नाही, महिलांनी पुन्हा चूल पेटवली जळतानासाठी डोक्यावर सरपाणाचा भारा

SCROLL FOR NEXT