Eknath Shinde
Eknath Shinde esakal
Premier

Eknath Shinde: अनिल कपूरच्या 'नायक' चित्रपटामधून प्रेरणा मिळाली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

priyanka kulkarni

Eknath Shinde: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत. त्यांच्या 'नायक' (Nayak) चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट रिलीज होऊन 23 वर्ष झाली आहेत.

तरी देखील आजही हा चित्रपट अनेकजण आवडीनं बघतात. अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितलं की, या चित्रपटातील अनिल कपूर यांची भूमिका त्यांना मनापासून आवडली.

एकनाथ शिंदेंनी नायक चित्रपटाचं केलं कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, "एस शंकर दिग्दर्शित नायक चित्रपटातील अनिल कपूर यांचं काम उत्तम होतं आणि हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे "

एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले की, त्यांनी कधी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते का? किंवा नायक या चित्रपटामधून त्यांनी प्रेरणा घेतली आहे का? ज्यावर त्यांनी उत्तर दिले "फिल्म फिल्म है, वास्तविकता-वास्तविकता है और कुछ भी नहीं (चित्रपट प्रेरणा देऊ शकतात, वास्तविकता ही वास्तविकता असते आणि दुसरे काहीही नाही)" 'नायक'या चित्रपटातील अनिल कपूरच्या व्यक्तिरेखेचं एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं.

'नायक 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

'नायक 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अनिल कपूर आणि दिग्दर्शक एस शंकर यांना मुंबईत एकत्र स्पॉट करण्यात आलं.

अनिल कपूर यांचे एकापाठोपाठ हिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ' ॲनिमल' आणि 'फायटर' या चित्रपटांमधल्या त्यांचा भूमिकाचं कौतुक झालं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. अनिल कपूर YRF Spy Universe मध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, ते अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे 2' मध्ये देखील दिसणार आहे.त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT