Sandeep Reddy Vanga slam Adil Hussain over regretting acting in Kabir Singh movie marathi entertainment news rak94
Sandeep Reddy Vanga slam Adil Hussain over regretting acting in Kabir Singh movie marathi entertainment news rak94 
Premier

Sandeep Reddy Vanga : “सिनेमातील तुमचा चेहराच बदलतो”; 'अ‍ॅनिमल'च्या डायरेक्टरची आदिल हुसैन यांना धमकी

रोहित कणसे, सकाळ ऑनलाईन टीम

वादग्रस्त विधानं आणि तितक्याच वादग्रस्त सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी आदिल हुसैन यांनी कबीर सिनेमाबाबत व्यक्त केलेल्या मताबाबत खडेबोल सुनावले आहेत. काही दिवसांपूर्वी आदिल हुसैन यांनी एक मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी कबीर सिंग सिनेमात काम केल्याबद्दल त्यांना पश्चाताप होतोय असं म्हंटलं. यावर वांगा यांनी त्यांना खडेबोल सुनावत त्यांचा सिनेमातील चेहरा AI च्या मदतीने बदलतील अशी धमकी दिली.

वांगा यांनी सोशल मीडियावर आदिल यांनी दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली. या मुलाखतीत आदिल यांनी त्यांनी कबीर सिंग हा सिनेमा साइन केला आणि त्यात काम केलं याचा पश्चाताप होतोय असं म्हंटलं होतं. याबाबत पोस्ट लिहीत वांगा यांनी स्वतःचा संताप व्यक्त केला. “तुमचा ‘विश्वास’ असलेले ३० समांतर सिनेमे आम्हाला ते यश नाही मिळवून देऊ शकत जे तुमचा ‘पश्चाताप’ असलेल्या एका सिनेमाने मिळवून दिलं. तुमच्या आवडीपेक्षा तुमची हाव जास्त आहे हे माहित असूनही मी तुम्हाला या सिनेमात घेतलं याचा मला पश्चाताप होतोय. मी आता तुमचा चेहरा AI च्या मदतीने बदलून तुम्हाला लाजिरवाण्या घटनांपासून वाचवतो त्यामुळे खुश व्हा.” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

वांगा यांच्या या उत्तरावर अनेकांनी कमेंट करत त्यांची नाराजी व्यक्त केली. “जो दिग्दर्शक प्रत्येकवेळी इतका आवेगाने व्यक्त होतो नक्कीच एक सर्जनशील कलाकार नाहीये. त्याचे सिनेमे त्याच्यातील हिंसक वृत्तीचं दर्शन घडवतात .अदिलने त्याच्या मनातील खंत बोलून योग्य तेच केलं आणि त्यामुळे वनागच खरं रूप पुन्हा एकदा उघडकीस आलं.” अशी कमेंट सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते अनंत महादेवन यांनी केली आहे. तर अनेक प्रेक्षकांनी सुद्धा वांग यांच्या बोलण्यावर टीका केली आहे.

याआधीही वांगा यांनी जावेद अखतर यांच्यावर टीका केली होती ज्यावर जावेद अख्तर यांनी खडेबोल सुनावले होते. त्यांच्यातील वाद बराच काळ सोशल मीडियावर गाजला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT