sukha kalale  sakal
Premier

Sukha Kalale Serial: स्पृहा जोशीच्या 'सुखं कळले' मालिकेत ट्विस्ट; प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिली?

Sukha Kalale Serial: छोट्या पडद्यावरील मालिका 'सुख कळले' मधील ट्विस्टवर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिलीये.

Payal Naik

छोट्या पडद्यावर नेहमीच टीआरपीची स्पर्धा पाहायला मिळते. या टीआरपी यादीत वर राहण्यासाठी कलर्स मराठीवर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातच अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची 'सुखं कळले' ही मालिकादेखील होती. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. मालिकेची वेगळी कथा, एकमेकांना संकटात साथ देणारे आणि संसार जपणारे पती पत्नी पाहायला प्रेक्षकांना आवडत होते पण आता या मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टबाबत प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या नव्या ट्विस्टनुसार माधवचा म्हणजेच मालिकेच्या मुख्य पात्राचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. तर त्याच्याजागी मिथिलाला सांभाळण्यासाठी एक नवीन व्यक्ती तिचा गार्डियन म्हणून येतोय असं दाखवण्यात आलं आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं, 'हिरो मारून काय मिळतं.. बहुतेक सगळया मालिकात तेच..आणि ही सिरियल तर आत्ता कुठे वेग पकडत होती.. मारायचाच होता तर जरा वर्षभर तरी जाऊ द्यायचं होतं.. सागर देशमुखनी मालिका सोडली असेल तर दुसरा कलाकार घ्या.. प्रेक्षक समजू शकतात.. आता पूर्वीसारखे नाही राहिले.. आता दुसरा हिरो आणतील.. वेगळ्या भूमिकेमध्ये.. सगळी भट्टी बिघडवून टाकतात..'

sukha kalale troll

आणखी एकाने लिहिलं, 'ही मालिका नवरा बायको अशा दोघांची आहे. ते दोघे मिळून कसं संकटांचा सामना करतात, आपलं कुटुंब, नाती कशी जपतात, प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड हे सगळं मालिकेच्या प्रोमो मध्ये मालिका सुरू होण्यापूर्वी महीनाभर दाखवत होतात ते यासाठीच का? प्लीज असलं काही दाखवू नका. तिचं सुख तिच्या नवऱ्यात आहे आणि तेच जर नसेल तर मालिका बघण्यात काहीच अर्थ नाही. कशाच सुख कळले????' एकूणच प्रेक्षक या मालिकेवर नाराज आहेत. हा नको तो ट्वीस्ट मालिकेत नक्की का आणला असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत. या मालिकेत एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. हा व्यक्ती आता मिथिलाला मदत करताना दाखवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT