Weather Update Esakal
पुणे

Weather Update: धुक्यांचा परिणाम विमान, रेल्वे प्रवासावर; तीव्र धुक्यामुळे पुण्याहून १० विमाने रद्द

Weather Update: दिल्लीत तीव्र धुक्यामुळे निर्माण झालेल्या खराब हवामानाचा फटका पुण्यातील विमान प्रवाशांना बसला. रविवारी दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानांची उड्डाणे होऊ शकली नाहीत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे: दिल्लीत तीव्र धुक्यामुळे निर्माण झालेल्या खराब हवामानाचा फटका पुण्यातील विमान प्रवाशांना बसला. रविवारी दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानांची उड्डाणे होऊ शकली नाहीत. त्यामुळे पुण्याहून नऊ विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, तर येथून दिल्लीला जाणाऱ्या एका विमानाला आठ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.

रविवारी पुणे, दिल्लीसह देशातील अन्य शहरांची विमानसेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिल्लीत रविवारी सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने उड्डाणांना फटका बसला. परिणामी विमानसेवा देणाऱ्या विविध कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली.

रद्द करावी लागलेली नऊपैकी पैकी पाच विमाने दिल्लीसाठी होती, तर इतर चार विमाने चेन्नई, प्रयागराज, अहमदाबाद व नागपूर या शहरांसाठी होती. मात्र दिल्लीहून विमाने आलीच नाहीत. परिणामी या शहरांसाठीची उड्डाणे रद्द करावी लागली. सुरवातीला विमान कंपन्या विमानाला उशीर होणार असल्याची घोषणा करीत असल्याने प्रवासी वाट पाहत बसून राहिले. परिणामी टर्मिनलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत राहिली. मात्र दुपारनंतर विमाने रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके असल्यामुळे त्याचा थेट परिणाम विमान सेवेवर होत आहे. या धुक्यामुळे पुणे ते दिल्ली विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे विमानतळ प्रशासनाने केले आहे. खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्लीसह उत्तर भागातील प्रयागराज, राजकोट,अहमदाबाद या सहा विमानांची उड्डाणे काल सकाळी रद्द करण्यात आली.तर दुपारनंतर आणखी चार विमानांसह दक्षिणेकडील चेन्नईला जाणारे एक विमान उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे एकूण १० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.वारंवार विमान उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

आठ तासांचा उशीर

पुण्याहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी झेपावणार होते. मात्र त्यास तब्बल आठ तासांचा उशीर झाला. अखेर दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी ते झेपावले. प्रवासी आठ तासांपेक्षा जास्त वेळ टर्मिनलवर बसून राहिले. संबंधित विमान कंपनी व विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना खाद्यपदार्थांची पाकिटे दिली.

दिल्लीत धुक्यामुळे कमी दृश्यमानता निर्माण झाली. परिणामी पुण्याला येणारी विमाने रद्द करण्यात आली. जे प्रवासी टर्मिनलमध्ये विमानाची वाट पाहत बसले होते त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT