maharashtra mandal.jpg
maharashtra mandal.jpg 
पुणे

15 दिवसांच्या प्रयत्नानंतर सौदी अरेबियातून 147 महाराष्ट्रीयन अखेर पुण्यात परतले अन्...

सकाळवृत्तसेवा

पुणे : सौदी अरेबियातील चार शहरांत अडकलेले 174 भारतीय मंगळवारी सायंकाळी पुण्यातील लोहगाव विमानतळावर चार्टड फ्लाईटने परतले. महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांतील हे रहिवासी आहेत. जळगावच्या 8 गर्भवतींचा आणि 47 पुणेकरांचा त्यात समावेश आहे. सौदी अरेबियातील रियाध, खोबर, दम्माम आणि जुबेल शहरांतून हे भारतीय परतले आहेत. महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांचे गेल्या 15 दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. खासदार गिरीश बापट यांच्या सहकार्याने वंदे भारत मिशनतंर्गत ते परतले आहेत. यातील अनेक जणांच्या कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या असून काही जणांच्या व्हिसाची मुदतही संपली आहे. सौदी अरेबियातून पुण्यात आलेली ही पहिली फ्लाईट आहे.
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा मर्यादीत झाली आहे. सौदीतील महाराष्ट्र मंडळाचे धनंजय डिंबळे, एस. व्ही. सहस्त्रबुद्धे, किरण आठवले आदींनी  यासाठी पुढाकार घेतला.

महाराष्ट्रातील नागरिकांची यादी तयार करून भारतीय दुतावासात सातत्याने त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. अखेर चार्टड फ्लाईट उपलब्ध झाले. परंतु, पुण्यात लॉकडाउन असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यासाठी खासदार बापट यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर हे विमान लोहगाव विमानतळावर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता उतरले. बापट यांच्यासह कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रचार -प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी त्यांचे स्वागत केले.
पुण्यात उतरलेल्या सर्व प्रवाशांना आता 7 दिवस एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले असून त्यानंतर त्यांना पुढील 7 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल. हॉटेलमधील वास्तव्याची मुदत पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या सहकार्याने त्या- त्या जिल्ह्यांतील प्रवासी रवाना होतील, असे खासदार बापट यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
गेल्या 8 वर्षांपासून मी सौदी अरेबियात काम करीत आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील अनेकजण तेथे अडकले होते. काहींच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तर काहीजणांची आर्थिक अडचण झाली होती. महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्यामुळे आम्ही पुण्यात पोचू शकलो.

-भूषण पवार, प्रवासी.


मी गेल्या 15 वर्षांपासून सौदीत काम करतो. महाराष्ट्र मंडळामार्फत आम्ही पुढाकार घेतला. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुण्यातून खासदार बापट यांनी सहकार्य केले. तसेच प्रशासनाने केलेल्या मदतीमुळे 174 महाराष्ट्रीयन पुण्यात पोचले. आता आम्हाला हायसे वाटत आहे.

-किरण आठवले, प्रवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT