Siddhi-kamthe
Siddhi-kamthe 
पुणे

‘आम्ही खळदकर’मुळे सिद्धीला कृत्रिम डोळा

सकाळवृत्तसेवा

खळद - खळद (ता. पुरंदर) येथील बाळासाहेब कामथे यांची मुलगी सिद्धी कामथे हिला आम्ही खळदकर ग्रामविकास संस्थेच्या आर्थिक मदतीमुळे कृत्रिम डोळा मिळाला आहे. यामुळे तिच्या जीवनात व कुटुंबात आनंद पसरला आहे.

सिद्धी ही शिवरी येथील महात्मा जोतिराव फुले विद्यालयात सहावीत शिक्षण घेत असून, आठ वर्षांपूर्वी तिने आपला एक डोळा गमावला. 

यानंतर तिचे पुणे, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी जवळपास ९ वेळा ऑपरेशन झाले; पण याचा काहीच उपयोग झाला नाही. यावर तिच्या पालकांनी या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला आपणास आर्थिक परिस्थितीमुळे हिचे डोळ्याचे ऑपरेशन व नवीन डोळा बसविण्याचा खर्च करणे शक्‍य होत नसल्याचे सांगत आपण मदत करावी अशी विनंती केली होती. त्यांची विनंती मान्य करून आम्ही खळदकर ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे सहखजिनदार सुदर्शन तानाजी कामथे यांचा स्वामी समर्थ हेल्थ ग्रुप, नवरत्न ग्रुप-चिंचवड व राजेंद्र कादबाने यांचा अनमोल रत्न ग्रुप पुणे यांनी पुढाकार घेत आर्थिक सहकार्य केले व या सहकार्यामधून आज तिला नवीन डोळा बसविण्यात आला आहे.

माझ्या मुलीला एका डोळ्याने दिसणार नाही याची आम्हास कल्पना होती; पण तिने किमान इतर मुलींसारखे तरी दिसावे अशी आमची इच्छा होती. आर्थिक परिस्थिती नसतानाही जवळपास ९ वेळा प्रयत्न केले मात्र, उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही आशा सोडली असताना; आम्ही खळदकर ग्रामविकास संस्थेने मोलाची मदत केल्याने माझी मुलगी इतर मुलींसारखी दिसू लागली. यामुळे आम्हा कुटुबांला खूप आनंद झाला आहे. 
- बाळासाहेब कामथे, सिद्धीचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT