accident on pashan road car and twowheler crash senior citizen death pune
accident on pashan road car and twowheler crash senior citizen death pune Sakal
पुणे

पाषाण रस्त्यावर भरधाव कारची दुचाकीला धडक; ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरीकाचा जागीच मृत्यु झाला. हि घटना शुक्रवारी (ता.10) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाषाण परिसरात घडली. याप्रकरणी कारचालक तरुणीविरुद्ध विरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल जोशी (वय 73, रा. बाणेर रस्ता, बालेवाडी) असे अपघातात मृत्यु झालेल्या दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी योगेश जोशी (वय 42) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बावधन येथे राहणाऱ्या कारचालक तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील अनिल जोशी हे सरकारी नोकरीतुन निवृत्त झाले होते. सध्या ते आयात-निर्यातीच्या विम्यासंबंधीचे काम करीत होते. जोशी हे शुक्रवारी त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कोथरुड येथे गेले होते. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरुन पाषाण रस्त्यावरुन त्यांच्या बाणेर रस्त्यावरील घरी जात होते. त्यांची दुचाकी पाषाण येथील एचईएमआरएल कंपनीसमोरुन जात होती. तेवढ्या महामार्गावरुन बावधनकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात जोशी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान, कारचालक तरुणीविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी हि महाविद्यालयामध्ये "एमबीए'चे शिक्षण घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT