Pune-University 
पुणे

पुण्यातील शैक्षणिक संस्थांकडून होत आहे जादा शुल्क आकारणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील एका नामांकित संस्थेत माझ्या मुलीने ‘एमबीए’ला प्रवेश घेतला होता. त्यासाठी दोन्ही वर्षांचे मिळून साडेसहा लाख शुल्क भरायला सांगितले होते. त्यापैकी २ लाख ९० हजार रुपये भरले. त्यानंतर शुल्क नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरून दोन्ही वर्षांचे मिळून २ लाख ७० हजार शुल्क असल्याचे समजले. याविरोधात तक्रार करणार, असे सांगितल्यानंतर संबंधित संस्थेने उर्वरित शुल्क माफ करत जास्त भरलेले २० हजार रुपये परत केले, असे एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही शैक्षणिक संस्थांकडून अनेकांची फसवणूक झाल्याची शक्‍यता असल्याने तंत्र शिक्षण विभागाने याबाबत चौकशी समिती नेमली आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात मिळून १५५ संस्थांमध्ये ‘एमबीए’चे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. नावाजलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते, पण ज्या विद्यार्थ्यांना ‘कटऑफ’पेक्षा कमी गुण असतात, ते जादा पैसे मोजून व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतात.

पुण्यातील एका नामांकित संस्थेमध्ये घडलेला वरील प्रकार समोर आल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने संबंधित संस्थेला जादा शुल्क घेतल्याने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात नोटीस बजावत शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्‍चित केलेली माहिती सादर करावी, असे आदेश दिल्याचे पुणे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी सांगितले. 

तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक दिलीप नंदनवार म्हणाले, ‘‘या तक्रारीवरून संबंधित संस्थेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल.’’

शुल्क नियामक प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेता येत नाही. अनेक पालकांना याबाबत  माहिती नसल्याने त्यांची फसवणूक झाली असण्याची शक्‍यता आहे. गेल्या चार वर्षांतील या संस्थेचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- अमर एकाड, अध्यक्ष, सुराज्य विद्यार्थी संघटना

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''जर इराणने माझी हत्या केली तर...'' डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सांगितला पुढचा प्लॅन

Numerology : 'या' मुलांकाचे पुरुष लग्नानंतर बदलून टाकतात बायकोचं आयुष्य; फक्त चूल-मुल न बघता 'तिला' पोहोचवतात यशाच्या शिखरावर

शाळा शिक्षणासाठी, राजकारणासाठी नाहीत! शाळेत मुख्यमंत्री विजय यांचा कार्यक्रम दाखवण्याऱ्या मुख्यध्यापकावर कारवाई, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोठा दिलासा; ठाण्यात तिकटीसाठी ११ ते ३१ जुलैदरम्यान अतिरिक्त आरक्षण खिडक्या, तीन गाड्यांचा थांबा..

SCROLL FOR NEXT