पुणे

"नव्या युद्धनीतीनुसार तिन्ही दलांना समन्वयाने कार्य करण्याची गरज"

अक्षता पवार

पुणे : आधुनिकतेबरोबर जगभरातील युद्धनीती बदलत आहे. देशाची सीमा, हवा, समुद्र, अवकाश आणि सायबर डोमेनमध्ये युद्धाचे स्वरूप सातत्याने विकसित होत असल्याने तिन्ही दलांना संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे. संयुक्तपणे कार्य करण्याची सातत्यता कॅडेट्सने भविष्यात देखील कायम ठेवावी. असे आवाहन नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यांनी केले.  

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. ॲडमिरल करमबीर सिंह यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी करत कॅडेट्सच्या वतीने मानवंदना स्वीकारली. या प्रसंगी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन, एनडीएचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री व इतर मान्यवर उपस्थित होते. कोरोनामुळे सलग तिसऱ्यांदा एनडीचा दीक्षांत संचलन सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत तसेच सर्व नियमांचे पालन करत शनिवारी सकाळी पार पडला. या प्रसंगी पांढऱ्या रंगाचे गणवेशात कॅडेट्सने सादर केलेल्या शिस्तबध्द संचलनाने उपस्थितांचे मने जिंकली. तर कॅडेट्सच्या पालकांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग नोंदविला.

ॲडमिरल सिंह म्हणाले, ‘‘सात दशकांपासून एनडीएने लष्कराच्या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविण्याचे कार्य करत आहे. एनडीएतून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडेट्सला भविष्यात विविध आव्हानांचा सामना करताना या तीन वर्षांच्या प्रशिक्षणाचा उपयोग होईल. लष्कराचे तिन्ही दलांचे एकत्रित प्रशिक्षण याठिकाणी दिले जाते ही महत्त्वपूर्ण बाब आहे, यामाध्यमातून त्यांना भविष्यातही समन्वयाने काम करता येऊ शकेल. गेल्या काही वर्षात लष्कराने देखील नव्या विभागांची, पदांची स्थापना केली. यासोबतच तिन्ही दलांचे एकत्रित समन्वय साधणारी ‘जॉइंट थिएटर कमांड’ कार्यान्वित होणार आहे. तर सेवाकार्य करताना कोणत्याही प्रतिकूल परिस्थीतीत देशसेवा हीच जवानांची पहिली सेवा असली पाहिजे हे विसरू नका.’’

यावेळी करमबीर यांनी व्यावसायिक ज्ञान, प्रामाणिकपणा आणि बौद्धिक उत्सुकतेचे महत्त्व यावर भर दिला. तसेच पालकांचे व साथीच्या काळात अनेक आव्हाने असूनही प्रशिक्षणाचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी एनडीएतील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

संचलनात एकूण 696 कॅडेट्सचा सहभाग

या संचलनात एकूण 696 कॅडेट्सने सहभाग घेतला होता. त्यात ३११ कॅडेट्स हे 140व्या तुकडीतील होते. तर या कोअर्समध्ये २१५ सैन्यदलाचे, ४४ नौदल तर ५२ हवाईदलाचे कॅडेट होते. तसेच अफगाणिस्तान, भूतान, मालदीव, श्रीलंका सारख्या मित्र देशांचे एकूण १८ कॅडेट्सचाही समावेश होता.

विजेत्यांचा सन्मान

या कार्यक्रमात प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कॅडेट्सचा सन्मान ॲडमिरल करमबीर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मौसम वत्स याने राष्ट्रपतींचेनी सुवर्ण पदक पटकावला. जयवंत ताम्रकरला गुणवत्तेच्या दुसऱ्या क्रमांकासाठी राष्ट्रपतींचे रौप्यपदक आणि तिसऱ्या क्रमांकासाठी नीरज सिंग पापोला याला राष्ट्रपतींचे कांस्यपदक प्रदान करण्यात आले. तर गोल्फ स्कॉडर्नला ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ने सन्मानित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैरदाबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT