Ajit Pawar sakal
पुणे

तोवर राज्यातील सरकारला काही होणार नाही : अजित पवार

अधिवेशनाच्या आधी बरीच विधाने केली गेल्याचे सांगत तारखादेखील जाहीर केल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी मोठे विधान केले आहे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हे सरकार पाच वर्षे पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे, त्यामुळे तोवर या सरकारला काही होणार नाही. (Mahavikas Aghadi Government) अधिवेशनाच्या आधी बरीच विधाने केली गेल्याचे सांगत तारखादेखील जाहीर केल्या होत्या. मात्र, अजित पवारांच्या या विधानानंतर भाजपाकडून (BJP) गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार पडणार पडणार या विधानांवर पाणी फेरले गेले आहे. ते पुण्यात आयोजित कालवा बैठकीत बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, युक्रेन रशिया यांच्या सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलच्या (Petrol Price) किंमतीत आणखी वाढणार होणार आहे.आत्ताच्या तुलनेत पेट्रोल डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.

पुण्यात वाढती गुन्हेगारी

दरम्यान, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारींच्या (Crime In Pune) घटनांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, पोलीस अधिक्षक अभिनव देशमुखांनादेखील वाढत्या गुन्हेगारींच्या घटनांबद्दल सांगितले असून,पोलीस आयुक्तांशीदेखील सांगणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पुण्यातल वाढत्या गुन्हेगारी घटनांबद्दल गृहमंत्री वळसे पाटील यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. सरकार पोलिसांच्या अडचणी सोडवतोय तर, त्यांनी कायदा सुव्यवस्था चोख ठेवली पाहिजे असे ते म्हणाले. (Ajit Pawar Latest News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT