Ambedkarnagar-Fire
Ambedkarnagar-Fire 
पुणे

राखेत शोधताहेत स्वप्नांचे अवशेष...

सकाळवृत्तसेवा

पुणे - आंबेडकरनगरातील आगीत ७५ झोपड्याच नव्हे; दोनशेवर लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. कुणाची रोकड, कुणाची पदव्यांची भेंडोळी आगीत खाक झाली आहेत. 

‘सकाळ’च्या प्रतिनिधीने आज (सोमवारी) आंबेडकरनगरमध्ये पाहणी केली, तेव्हा भरउन्हात हक्काच्या सावलीसाठी सुरू असलेली धडपड दिसली.

झोपडपट्टीतील समाजमंदिरात, देवीच्या मंदिरात जळितग्रस्तांनी आश्रय घेतला. काही जण नातेवाइकांकडे गेले; काहींनी मार्केट यार्डातील शेडमध्ये दोन दिवस काढले. जे घर हातांनी उभे केले, त्याची रणरणत्या उन्हात राख गोळा करण्याची वेळ या लोकांवर आली. कष्टाने घेतलेल्या दागिन्यांचा राखेतही काही जण शोध घेत आहेत. 

बांधकाम मजूर, घरकामगार अशी कष्टाची कामे करण्याऱ्यांची ही वसाहत. हातावरचे रोजचे पोट. या संकटात समाजाचे मदतीचे हात पुढे येत आहेत. गुरुनानक सच्चा सौदा सेवाचे स्वर्णसिंह सोहल आणि त्यांचे सहकारी जळीतग्रस्तांना नाष्टा देत आहेत. इतर स्वंयसेवी संस्थाही मदत करीत आहेत. 

जळालेल्या झोपड्यांची राख गोळा करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मार्केट यार्ड मुख्य बाजाराच्या प्रवेशद्वार क्रमांक चार जवळ एक तात्पुरती शेड उभी होत आहे. या ठिकाणी तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाईल. महापालिकेकडून वासे आणि पत्रे याची मदत जळितग्रस्तांना केली जाईल. 

झोपडपट्टीतील चार जणांचे विवाह ठरले होते. त्यासाठी जमवलेले पैसे, लग्नाचा बस्ता अशा गोष्टी आगीत नष्ट झाल्या. आता हे विवाह कसे पार पाडायचे, असा प्रश्न त्या कुटुंबांसमोर उभा आहे. 

खैरनुस्सा शेख मूळच्या कर्नाटकच्या. त्यांचे येथे कोणी नातेवाईक नाहीत. त्यामुळे घराच्या राखेवरच बसून त्या आणि त्यांचा मुलगा जेवण करीत होते. प्रसूतीसाठी माहेरी आलेली मुलगी दवाखान्यात आहे आणि घरी अशी परिस्थिती. ‘काय करावे कळत नाही,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मी इंदापूरला शिकतो. आगीची घटना कळली आणि थेट पुण्याला आलो. दोन दिवस अभ्यास नाही. परीक्षा देण्यासाठी इंदापूरला जायचे आहे. आई आणि भाऊ इथे राहतात. घर आणि परीक्षेची चिंता आहे. घरात जमविलेले पंधरा हजार रुपये जळून खाक झाले.  
- शुभम मिसाळ, विद्यार्थी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Constituency Lok Sabha Election Result: अखेर कोल्हापुरकरांचे मत अन् मान गादीलाच! शाहू महाराजचं ठरले किंग

Maharashtra Lok Sabha Election Results Live : दिल्लीमध्ये बैठक घेऊन सामूहिक निर्णय घेणार- शरद पवार

Raigad Constituency Lok Sabha Election Result: अजित पवारांचा एकमेव सुभेदार रायगडमध्ये विजयी! अस्तित्वाच्या लढाईत गितेंचा पराभव

Sharad Pawar: शरद पवारांनी केलं लोकसभेच्या निकालाचं विश्लेषण; म्हणाले, महाराष्ट्र आता...

Hyderabad Lok Sabha Election Results : हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवैसींचा मोठा विजय; माधवी लतांचा दारुण पराभव

SCROLL FOR NEXT