Navnagar-Vikas-Pradhikaran Building
Navnagar-Vikas-Pradhikaran Building 
पुणे

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत प्राधिकरण

दीपेश सुराणा

नवनगर विकास प्राधिकरणाकडून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी १४ हजार ६५६ परवडणारी घरे उभारण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय मोशी येथे २४० एकर क्षेत्रांत पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन व कन्व्हेन्शन केंद्राचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. शहरात नामांकित शैक्षणिक संस्था याव्यात, यासाठी शैक्षणिक भूखंड लिलाव पद्धतीने ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिले जातील. भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्राचा वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या धर्तीवर विकास करणार आहे. विविध पेठांमध्ये व्यापारी भूखंड विकसित केले जातील, अशी माहिती नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

प्राधिकरण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी संपादनाखाली असलेल्या क्षेत्राचे एक ते ४२ पेठा व चार मध्यवर्ती सुविधा केंद्र, असे नियोजन केले आहे. प्राधिकरणातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) पेठ क्रमांक १२ येथे पहिल्या टप्प्यात ४० एकर क्षेत्रांत ४८८३ घरे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. पर्यावरण ना-हरकत दाखल्याची (एनओसी) कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ती मिळाल्यानंतर काम सुरू होईल. 

पेठ क्रमांक १२ येथील उर्वरित ८० एकर क्षेत्रांत दुसऱ्या टप्प्यात पाच हजार घरे उभारली जाणार आहेत. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची कार्यवाही सुरू आहे. पेठ क्रमांक सहामध्ये ३८४ घरे उभारण्यासाठी कामाचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, प्राधिकरणातील विविध पेठांमध्ये छोट्या-छोट्या भूखंडांवर चार हजार घरे उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वास्तुविशारद, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची कार्यवाही सुरू आहे.  

उद्योग, शैक्षणिक संस्थांना वाव
मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांना प्राधिकरणातर्फे पेठ क्रमांक सात व १० मध्ये भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. चिखली येथील टाटा मोटर्सला (कार प्लॅन्ट) प्राधिकरणातर्फे दोनशे एकर जागा दिली. त्यामुळे त्यांना उद्योग विस्ताराला वाव मिळाला. शहरात नामांकित शैक्षणिक संस्था याव्यात, यासाठी प्राधिकरणाच्या विविध पेठांमध्ये १० ते ११ शैक्षणिक भूखंड विकसित केले जाणार आहेत. तसेच, हे भूखंड शैक्षणिक संस्थांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिले जातील. यापूर्वी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला (सीओईपी) ३० एकर जागा दिलेली आहे.  

औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा विकास  
मोशी येथील २४० एकर जागेत पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन व कन्व्हेन्शन केंद्राचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये मंजूर बृहत्‌ आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात २०.११ हेक्‍टरवर खुल्या प्रदर्शन केंद्राचा विकास केला जाईल. त्यासाठी राज्य सल्लागार समिती व पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. संबंधित कामासाठी ६६ कोटी २२ लाख रुपये प्रशासकीय खर्चास मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच निविदा प्रसिद्ध करून कामास सुरवात होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या मंजूर बृहत्‌ आराखड्यात तीन प्रदर्शन हॉल (एकत्रित क्षेत्रफळ - एक लाख पाच हजार चौरस मीटर), एक कन्व्हेन्शन सेंटर (पाच हजार आसन क्षमता), खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी मोकळे मैदान (९८ हजार चौरस मीटर), अंतर्गत रस्ते, बगीचे, तलाव, व्यापारी वापरासाठी राखीव जागा, भूमिगत पेट्रोलियम लाइनसाठी संरक्षित खुली पट्टीच्या स्वरूपातील जागा/ग्रीन बेल्ट, बस टर्मिनस, मेट्रो स्टेशन, हेलिपॅडसाठी राखीव जागा आदी बाबींचा समावेश आहे. प्रदर्शन केंद्राचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे. एकूण ९४.७४ हेक्‍टरपैकी ११ हेक्‍टर क्षेत्राचे सपाटीकरण, तसेच संपूर्ण प्रदर्शन केंद्राच्या क्षेत्राला सीमाभिंत टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

व्यापारी संकुल उभारणार
प्राधिकरणातर्फे भक्ती-शक्ती चौक, वाल्हेकरवाडी, पेठ क्रमांक सहा, सात आणि १० मध्ये व्यापारी संकुल सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी आवश्‍यक निविदा प्रसिद्ध केली आहे. भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्राचा विकास मुंबईतील वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या धर्तीवर करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे व्यापाराला चालना मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT