पुणे

पहिल्याच प्रयत्नात अनुष्का ‘सीए’

CD

मंचर, ता. १४ : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील अनुष्का वैशाली शिंदे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अवसरी खुर्द गावातून सवाद्य मिरवणूक काढून तिचा गौरव केला.
अनुष्का ही भाडेतत्त्वावरील खोलीत राहून शिक्षण घेणाऱ्या कुटुंबातील मुलगी. तिच्या शिक्षणासाठी आई वैशाली यांनी फार कष्ट घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिचे शिक्षण केले. वैशाली शिंदे या खासगी ट्रान्सपोर्टमध्ये काम करून संसाराचा गाडा चालवत होत्या. आर्थिक अडचणी असूनही मुलीचे शिक्षण थांबता कामा नये, या निर्धारातून त्यांनी अनुष्काला शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले.
अनुष्काने नालंदा स्कूल, शेवाळवाडी, मंचर येथे दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवले. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे वाणिज्य शाखेत बारावीच्या परीक्षेतही तिने ९३ टक्के गुण मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. पुढे पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट विराट देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सीए परीक्षेची तयारी केली.
या प्रवासात आई वैशाली शिंदे, दत्तात्रेय बांगर, गणेश बांगर, अलका फदाले, दत्ता वर्पे यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. तसेच प्राचार्य नितीन बाणखेले यांनी व शिक्षकांनी शिक्षणकाळात तिला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
सीए परीक्षेत यश मिळाल्यानंतर अवसरी खुर्द येथील गावकऱ्यांनी अनुष्का आणि तिच्या आईचा सवाद्य मिरवणूक काढून तिचा श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर सत्कार केला. त्यानंतर मंचर येथे पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते व महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य नितीन बाणखेले यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

“आर्थिक अडचणी कितीही असल्या तरी मेहनत, जिद्द आणि आईचे पाठबळ असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. माझ्या यशामागे आईचे कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. इतर गरीब कुटुंबातील मुला-मुलींना सीए परीक्षेसाठी मी वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे.”
-अनुष्का शिंदे, चार्टर्ड अकाउंटंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

१२ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष! विद्यापीठाने ५ दिवसांत लावले १७ अभ्यासक्रमांचे निकाल; उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क, वाचा...

Panchang 30 April 2026 : आजचे पंचांग! नृसिंह जयंती, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली

SCROLL FOR NEXT