यशवंतराव चव्हाण नाट्यगृह : ‘संवेदन’ या कार्यक्रमात ‘तन्मात्र’ ही आगळीवेगळी नृत्यसंरचना सादर करताना कलावंत.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह : ‘संवेदन’ या कार्यक्रमात ‘तन्मात्र’ ही आगळीवेगळी नृत्यसंरचना सादर करताना कलावंत. 
पुणे

पंचमहाभूतांच्या उत्पत्तीची नृत्यकथा

नीला शर्मा

रंगमंचावर तरल, चित्तवेधक नृत्यकथा साकार होत होती. 
तिचा आशय असा, की जेव्हा सृष्टी नव्हती, ब्रह्मांडही नव्हतं; होता केवळ अंधकार. अशात अचानक एक बिंदू उत्पन्न झाला. त्यात हालचाली सुरू झाल्या. त्यातून परिवर्तन घडून आलं. आधी अवकाश, मग वायू, नंतर तेज, जल ही चार महाभूतं अस्तित्वात आली. त्यांच्या संयोगातून पृथ्वी निर्माण झाली. कालांतरानं तिच्यावर सजीव प्रगटला. सृष्टीचं सृजन झालं. ‘तन्मात्र’ या नृत्यात्मिकेतून (बॅले) पंचमहाभूतांच्या सूक्ष्म रूपाचं दर्शन घडविण्यात आलं.

पंडिता रोहिणी भाटे यांच्या प्रतिभेतून आकाराला आलेली ही नृत्यसंरचना पंचवीस वर्षांनंतर त्यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांनी आपल्या ‘प्रकृती कथक नृत्यालया’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सादर केली. रोहिणीताईंना आदरांजली म्हणून नीलिमा यांच्यासह गुरुभगिनी व नव्या पिढीतील शिष्यांनी अत्यंत सुंदर अशी ही प्रस्तुती केली.

उपनिषदांमधील ऋचांचा आधार घेऊन रोहिणीताईंनी स्वतः संगीतबद्ध केलेली ही अनुपम कलाकृती पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत गाजली होती. साहित्य, संगीत, नृत्य यांतून परंपरा व नवतेचा आशयघन, सौंदर्यपूर्ण सेतूच या संरचनेतून बांधला गेला होता. त्याच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद जुन्या, जाणत्या रसिकांना घेता आला; तर नव्या मंडळींना एका ऐतिहासिक कलाकृतीची विलक्षण अनुभूती घेता आली. कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘संवेदन’ या आयोजनात हा अनोखा अनुभव घेता आला. उत्तरार्धात प्रसिद्ध धृपदगायक पंडित उदय भवाळकर यांनी राग शंकरा आणि जोग भावपूर्ण रीतीने सादर केले. त्यांना प्रताप आवाड (पखवाज) तसेच चिंतन उपाध्याय व प्रसन्न विश्वनाथन (तानपुरा) यांनी साथ केली. सुरुवातीला नीलिमा अध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. नृत्य अभ्यासक डॉ. चेतना ब्योहार उपस्थित होत्या. आसावरी पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT