Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj Sakal
पुणे

Chhatrapati Shivaji Maharaj : आसाममध्ये उभारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा

Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांचा सात फूट उंचीचा अश्‍वारूढ पुतळा आसाममधील जोराहाट येथे २९ मार्च रोजी उभारण्यात येणार आहे. २१ पॅरा स्पेशल फोर्स, २१ वाघनखं परिवार आणि ऑल इंडिया एक्स सर्व्हिसमन वेल्फेअर असोसिएशनच्या पुढाकाराने हा पुतळा उभारण्यात येत आहे.

नऱ्हे येथील शिल्पकार खटावकर यांच्या स्टुडिओत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नुकतेच पूजन करण्यात आले. या वेळी जनरल शिशिर महाजन, ब्रिगेडियर गोविंद इलंगोवन, ब्रिगेडियर पी. टी. घोगले, कर्नल एस. राजगोपाल, कॅप्टन स्वामिनाथन, मेजर बी. धामणकर, कर्नल एच. डी. खांडगे, कर्नल संभाजी पाटील, कर्नल राजगोपालन आदी उपस्थित होते.

हा पुतळा शिल्पकार विराज विवेक खटावकर यांनी दोन महिन्यांत साकारला आहे. ‘२१ वाघनखं परिवार’च्या सर्व कमांडोज व परिवारने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. खटावकर म्हणाले, ‘‘जोराहाट येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इपॉक्सी व पॉलिस्टर रेझिनमध्ये तयार करण्यात आला आहे.

त्याचे वजन २५० किलो असून, त्यामध्ये मजबुतीसाठी ‘एमएस’चा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्यावर अफजल खान वधाचे चार फुटांचे शिल्प चार बाय चार फुटांची राजमुद्रा आणि तीन बाय दोन फूट आकाराचे वाघनखाचे शिल्प बसविण्यात आले आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT