junnar
junnar 
पुणे

विघ्नहर साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

सकाळवृत्तसेवा

जुन्नर - राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा गाळप हंगाम २०१७-१८ साठीचा तांत्रिक कार्यक्षमतेचा देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास सोमवारी ता.10 रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.   

माजी केंद्रीय मंत्री,पद्‌मविभूषण शरद पवार, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री सी.आर.चौधरी, उत्तर प्रदेशचे शुगरकेन मंत्री सुरेश राणा, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष अमित कोरे, माजी अध्यक्ष जयंतीभाई पटेल, कल्लाप्पा आवाडे, खासदार विजयसिंग मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 

विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, संचालक व अधिकारी आणि कामगार युनियनचे पदाधिकारी यांनी एका कार्यक्रमात समारंभपूर्वक हा पुरस्कार स्विकारला. 

शेरकर म्हणाले, गेल्या हंगामात तांत्रिक कार्यक्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करत दैनंदिन ऊस गाळप क्षमता ५००० मेट्रिक टन असतानाही सुमारे ६००० मेट्रिक टन प्रतिदिन गाळपाचा वेग ठेवून सरासरी ११२ टक्के क्षमतेचा वापर केला. पुणे जिल्ह्यात उच्चांकी असे प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ५० हजार ४५० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. त्यापासून १२ लाख ३४ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा ११.७५ % राखण्यात यश मिळविले. सहवीजनिर्मीती प्रकल्पातून ४ कोटी ४० लाख ६७ हजार युनिट वीज निर्यात केली असून डिस्टीलरीमधून ५५ लाख २५ हजार ५०० लिटर अल्कोहोल व ११ लाख २१ हजार ३३५ लिटर इथेनॉलची निर्मीती केली आहे. कमीत कमी स्टॉपेजेस, वाया जाणार्‍या साखरेचे प्रमाण, स्टीमचा वापर, वीजेचा वापर, जास्तीत जास्त मिल एक्स्ट्रॅक्शन, बॉयलिंग हाऊस रिकव्हरी, बगॅस सेव्हींग या सर्व बाबींचा विचार होवून विघ्नहर कारखान्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  

ते म्हणाले, संपूर्ण देशातील तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे श्री विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानाची बाब आहे. माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर व माजी अध्यक्ष स्व.सोपानशेठ यांच्या आर्दशाप्रमाणे कारखान्याची यशोपताका अधिकाधिक उंचावली आहे. आगामी २०१८-१९ गाळप हंगामात सुमारे १२ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून  गाळप हंगामाची जोरदार तयारी सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

SCROLL FOR NEXT