crime
crime sakal
पुणे

Pune News : धायरी परिसरात खळबळ! कचऱ्यात सापडले नवजात अर्भक

विठ्ठल तांबे

Dhayari News -धायरी फाटा येथील सणस शाळे जवळील मुख्य रस्त्यावर कचऱ्यात  सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवजात मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, स्थानिकांच्या मदतीने अर्भक ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी आठच्या  सुमारास  सणस शाळे शेजारील कचराकुंडी जवळ नवजात अर्भक दिसले होते. अशी माहिती पुणे मनपाच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले आहे.

हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो .आजूबाजूला मोठी वस्ती आहे. याच वस्तीतील एखाद्या मातेने अर्भक फेकून दिले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 1 जून 2024

Latest Marathi News Live Update: शेटवच्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरूवात

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT